विक्रमगडमध्ये एकाच रात्री तीन घरफोड्या

By admin | Published: May 6, 2017 05:23 AM2017-05-06T05:23:41+5:302017-05-06T05:23:41+5:30

येथीाल जरीमरी नगरामध्ये दिवसांपूर्वी एकच रात्रीत तिन ठिकाणी घरफोडया करुन चोरट्यांनी चांदी सोने, रोख रक्कम मिळून

Three houses in Vikramgad in one night | विक्रमगडमध्ये एकाच रात्री तीन घरफोड्या

विक्रमगडमध्ये एकाच रात्री तीन घरफोड्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
विक्रमगड : येथीाल जरीमरी नगरामध्ये दिवसांपूर्वी एकच रात्रीत तिन ठिकाणी घरफोडया करुन चोरट्यांनी चांदी सोने, रोख रक्कम मिळून जवळ जवळ २ लाख १८ हजाराचा ऐवज लंपास केला आहे़
काही महिन्यांपासुन विक्रमगड शहर परिसरात वारंवार मोबाईलची दुकाने फोडून तसेच घरफोडीचे प्रकार वाढलेले असून या चोरटयांच्या टोळीला पकडण्यात पोलिसांना अजून यश आलेले नाही. वर्षभरापासून शहर व परिसरामध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. चोरी झाली केली विक्रमगड पोलीस स्टेशन कडून गस्ती वाढतात. कालांतराने त्या बंद होतात. असे चित्र असून गस्ती वाढवून झालेल्या चोऱ्यांचा सुगावा लावावा अशी मागणी यतीन पाटील यांनी केली आहे.
सध्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी लागल्याने शहरातील अनेक घरांना कुलूप पहायला मिळत असून हाच काळ चोरांसाठी सुगीचा मानला जातो. याबाबात सर्तक राहाण्याकरीता लोकमतीने ‘सुटीमध्ये घराची काळजी घ्या, सर्तक राहा’ याबाबत वृत्त प्रसिध्द केली होेती. त्यानंतर दोन दिवसात एकच रात्रीमध्ये तिन ठिकाणी घरफोडया झाल्या त्यामध्ये यतीन घरत, रघुनाथ दुपारी व जनार्दन पाथवट यांचे घराची कुलप फोडून मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे़
गेल्या वर्षी सुद्धा हयाच महिन्याच्या पहिल्याच आठवडयात एकाच रात्री मध्ये जरीमरी नगर परिसरात जवळ जवळ सहा ठिकाणी घरफोडया झाल्या होत्या़ चोरी करणारे इसम प्रथम परिसराची हेटाळणी करुन माहिती घेतात. त्याप्रमाणे रात्रीच्या गोटामध्ये ज्या घरास कुलूप आहे़ त्या घरात चोरी करायची व आजू बाजूच्या घरांच्या कडया बाहेरुन लाऊन घ्यायच्या हे तंत्र वापरले जाते. यतीन घरत हे चोर घरामध्ये असतांनाच लग्नाहुन परत आले होते. परंतु त्याचे बरोबर घरातील महिला असल्याने त्यांना काहीच करता आले नाही. मात्र चोरांनी घरत यांचा गाडीचा आवज ऐकल्याने पळ काढला. चोर सशस्त्र असल्याने त्यांनी यावेळी कुटूंबाच्या सुरक्षेला महत्व दिले.
दरम्यान, सध्यस्थित विक्रमगडमध्ये पोलिसांची गस्त वाढली पाहीजे, गत वर्षभरामध्ये अनेक मोबाईल दुकाने फोडने, घरफोडी, सायकल चोरी, पेटेलचोरी, मोटरसायकल चोरी असे प्रकार सर्रास वाढले आहेत़ व यामधील आरोपी पोलिसांच्या हाती अदयापही लागलेले नाही. ़त्यामुळे आता पोलिसांनी चोरटयांना जेरबंध करावे अशी मागणी होत आहे़

विक्रमगडमधील चोरी व घरफोडया ही बाब चिंताजनक बनली आहे. त्यामुळे पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेऊन शहरातील रात्रीची गस्त वाढवुन संशयीतांनी चौकशी करावी. घटना घडल्या बरोबरच त्याचा पंचनामा व त्याकरीता योग्य त्या उपाय योजना कराव्यात
- महेंद्र पाटील, नगरसेवक, जरीमरी नगर विक्रमगड

नागरिकांनी बाहेरगावी जाण्यापूर्वी पोलिस कार्यालयात याची माहिती नोंदवणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आपल्या घराचे दारे-खिडक्या काळीपुर्वक बंद करणे, सिक्युरिटी नेमतांना त्याची संपुर्ण पार्श्वभूमीची माहिती घ्या,भाडेकरु ठेवतांना माहितीतीलच ठेवा याबाबतची नोंद निदान याकाळात तरी पोलिस कार्यालयात दया! - विजय शिंदे, पोलिस अधिकारी विक्रमगड

Web Title: Three houses in Vikramgad in one night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.