कल्याणमध्ये होर्डिग्ज पडण्याच्या तीन घटना, दहा जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:42 AM2021-05-18T04:42:33+5:302021-05-18T04:42:33+5:30

कल्याण : वादळी वाऱ्यामुळे कल्याण शीळ रस्त्यावर होर्डिंग पडण्याच्या तीन घटना घडल्या. दुपारी एका घटनेत टेम्पोतील दोन जण जखमी ...

Three incidents of hoardings falling in Kalyan, ten injured | कल्याणमध्ये होर्डिग्ज पडण्याच्या तीन घटना, दहा जखमी

कल्याणमध्ये होर्डिग्ज पडण्याच्या तीन घटना, दहा जखमी

Next

कल्याण : वादळी वाऱ्यामुळे कल्याण शीळ रस्त्यावर होर्डिंग पडण्याच्या तीन घटना घडल्या. दुपारी एका घटनेत टेम्पोतील दोन जण जखमी झाले. जखमींची नावे सचिन चव्हाण आणि छगन चौधरी अशी आहेत. सायंकाळी कल्याण शीळ रस्त्यावरील कल्याण मेट्रो मॉलनजीक एका बसवर जाहिरातीचे होर्डिंग पडल्याने खासगी बसमधील आठ प्रवासी किरकोळ जखमी झाले. बसमध्ये एकूण २२ प्रवासी प्रवास करीत होते. होर्डिंग पडत असल्याचे पाहून बसचालक अरुण दातखिळ यांनी वेळीच ब्रेक दाबला. त्यामुळे होर्डिंग बसच्या पुढच्या भागावर पडले. चालकाच्या प्रसंगावधानामुळे २२ जणांचा प्राण वाचला. दरम्यान, सायंकाळी चार वाजता कल्याण शीळ रस्त्यावरील पलावा जंक्शन येथेही होर्डिंग पडले. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी घाव घेतली. आ. पाटील म्हणाले की, राज्यात यापूर्वीही होर्डिंग पडून लोक मृत्युमुखी पडले आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिका, राज्य रस्ते विकास महामंडळ आणि ठाणे महापालिकेकडे जीवघेण्या ठिकाणी बसवलेली होर्डिंग काढून टाकण्याची मागणी केली होती. अधिकारी आणि बड्या जाहिरात कंपन्यांचे साटेलोटे असल्याने ही होर्डिंग्ज काढली जात नसल्याचा आरोप पाटील यांनी केला.

दरम्यान, वादळी वाऱ्यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या गच्चीवरील पाण्याची टाकी खाली पडली. या घटनेत कोणालाही इजा झाली नाही.

------------------

वाचली

Web Title: Three incidents of hoardings falling in Kalyan, ten injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.