केरळचे तीन एजंट पोलिसांच्या रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 05:11 AM2017-08-07T05:11:51+5:302017-08-07T05:11:51+5:30

बनावट सीडीसी (निरंतर निर्वहन प्रमाणपत्र) विकणाºया टोळीतील तीन एजंट्सची नावे तपासात समोर आली आहेत. तिन्ही एजंट केरळचे रहिवासी असून, त्यांचा तपशील पोलिसांच्या हाती लागला आहे.

Three Kerala agents on the police radar | केरळचे तीन एजंट पोलिसांच्या रडारवर

केरळचे तीन एजंट पोलिसांच्या रडारवर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : बनावट सीडीसी (निरंतर निर्वहन प्रमाणपत्र) विकणाºया टोळीतील तीन एजंट्सची नावे तपासात समोर आली आहेत. तिन्ही एजंट केरळचे रहिवासी असून, त्यांचा तपशील पोलिसांच्या हाती लागला आहे.
नौसैनिक आणि अन्य काही पदांसाठी उमेदवारांना सीडीसी अनिवार्य असते. पासपोर्ट, तसेच व्हिसाएवढे महत्त्व असलेला हा दस्तावेज बनावट तयार करून, उमेदवारांना त्याची ५० हजार ते लाख रुपयात विक्री करणाºया चौघांना, ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने गेल्या आठवड्यात अटक केली होती. गुन्हे अन्वेषण शाखेच्या घटक क्रमांक १ चे सहायक पोलीस निरीक्षक संदीप बागुल या प्रकरणाचा तपास करीत आहेत. आरोपींजवळून काही बनावट सीडीसींसह वैध पासपोर्टही पोलिसांनी हस्तगत केले होते. बनावट सीडीसींची विक्री करण्याचा आरोपींचा गोरखधंदा ६ ते ७ वर्षांपासून सुरू होता. सीडीसींची गरज असलेले उमेदवार हेरून, त्यांच्याशी व्यवहार करण्यासाठी आरोपींचे हस्तक वेगवेगळ्या शहरांमध्ये कार्यरत होते. आरोपींच्या चौकशीतून अशा काही हस्तकांचा तपशील पोलिसांच्या हाती लागला आहे. त्यापैकी तीन हस्तक केरळचे रहिवासी असून, पोलीस यंत्रणा त्यांच्या मागावर आहे.

Web Title: Three Kerala agents on the police radar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.