दुचाकी अपघातात तीन ठार, एक वर्षाचा मुलगा सुखरूप; शहापूर येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 03:26 PM2020-06-19T15:26:27+5:302020-06-19T15:26:41+5:30
वेगावर नियंत्रण न आल्याने अपघात प्राथमिक अंदाज.
कसारा/ भातसानगर - शहापूर तालुक्यातील भातसानगर येथील भातसा धरणाकडे जाणाऱ्या उताऱ्यावरी खिंडीत आज सकाळी झालेल्या दुचाकीच्या अपघातात दुचाकी वरील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर या दुचाकीवरील एक वर्षाच्या मुलगा मात्र सुखरूप आहे.
तालुक्यातील सारंगपूरी गावाजवळील भातसा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या मुरबीचा पाडा येथील सोमनाथ दत्तू वाख आपल्या मुलगा व पत्नीसह सासुरवाडीस गेला होता आज सकाळी तो आपली पत्नी मुलगा व मेहुणा यांच्या समवेत भातसा नगर साजीवली मार्गाने भातसा नगर धरणाच्या उतारावरील हनुमान मंदिराच्या पुढील खिंडीत दुचाकी वहानाचा वेग न आवरल्याने वा दुचाकीचा ब्रेक फेल झाल्याने झालेल्या विचित्र अपघातात सोमनाथ दत्तू वाख ( 35),जिजा सोमनाथ वाख (25),राजू काळू मांगे (रा.विंचूपाडा )यांचा जागीच मृत्यू झाला.
विशेष म्हणजे हे तिघेही अस्तव्यस्त अवस्थेत इतरत्र फेकले गेले होते .मात्र याच दुचाकीवरील स्वप्नील सोमनाथ वाख हा एक वर्षाचा मुलगा मात्र सुखरुप आहे.त्याला किरकोळ दुखापत झाली आहे. स्थनिकांच्या मदतीने हे मृत देह बाहेर काढण्यात येऊन ते शल्यचिकित्से साठी उपजिल्ह्या रुग्णालय शहापूर येथे पाठविण्यात आले असून खर्डी पोलिसांत अपघाती मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे. या अपघाताची माहिती या दुचाकीवरील एक वर्षाच्या स्वप्नील नावाच्या लहानमुलाच्या रडण्याने आल्याने येथून प्रवास करणाऱ्यांनी येथील सरपंच बाळू वेगळे यांना देताच त्यांनी खर्डी पोलिसांना या घटनेची माहिती दिली हा अपघात अति वेगाने दुचाकी कंट्रोल मध्ये न आल्याने झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या अतिशय घातक आशा वळणाच्या उतारावर आता पर्यंत भातसा धरणाचे काम सुरू झाल्यापासून आता पर्यंत अपघात झाले असून अनेक जण जीवनास मुकले आहेत.