दरोडा आणि सामूहिक बलात्कारप्रकरणी तीन जणांना जन्मठेप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 04:09 PM2019-02-16T16:09:28+5:302019-02-16T16:11:23+5:30
भिवंडीत दरोडा टाकल्यानंतर विवाहितेवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या 7 पैकी नवीन अशोक बागडे, संतोष शेळके आणि राजकुमार सहानी या तिघांना ठाणे न्यायालयाच्या न्यायाधीश एस ए सिन्हा यांनी पुरावे अभावी दोषी ठरवले.
ठाणे: भिवंडीत दरोडा टाकल्यानंतर विवाहितेवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या 7 पैकी नवीन अशोक बागडे, संतोष शेळके आणि राजकुमार सहानी या तिघांना ठाणे न्यायालयाच्या न्यायाधीश एस ए सिन्हा यांनी पुरावे अभावी दोषी ठरवले. या तिघांनाही शनिवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तर, चौघांनी पुरावे नसल्याने निर्दोष सुटका केली. ही घटना पाच वर्षांपूर्वी घडली होती. या खटल्याच्या वेळी सरकारी वकील म्हणून संजय मोरे यांनी काम पाहिले.
निजामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी पीडित विवाहिता गणेशोत्सवात गणपती पाहण्यासाठी उत्त्तर प्रदेशातून आली होती. त्याचदरम्यान 7 जणांच्या टोळक्यांनी घरात प्रवेश केला. पीडित महिलेच्या पतीला सोन्याचे दागिने पैसे कुठे ठेवले आहेत. ते दाखवण्यासाठी नेले तेथे त्याला मारहाण केली. तसेच पीडितेेवर सामूहिक बलात्कार केला. तर तिच्या छाती आणि मांडीवर त्या नराधमांनी चावाही घेतला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर निजामपूर पोलिसांनी 7 जणांना अटक केली. हा खटला ठाणे जिल्हा सहा. सत्र न्यायालयाच्या न्यायधीश सिन्हा यांच्यासमोर आल्यावर सरकारी वकील मोरे यांनी पीडितेेसह 10 साक्षीदार तपासले तसेच वैद्यकीय अहवालानुसार तिघांना दोषी ठरवले.
त्यानुसार, त्यांना जन्मठेपसह प्रत्येकी 10 हजार रुपये दंड आणि नुकसान भरपाई म्हणून प्रत्येकी 15 हजार रुपये अशी शिक्षा सुनावली. 10 हजार दंड भरला नाहीतर एक महिना आणि 15 हजार रुपये नुकसान भरपाई दिली नाहीतर 6 महीने अतिरिक्त शिक्षा होणार आहे.