आगीत तिघे जखमी
By admin | Published: December 8, 2015 12:23 AM2015-12-08T00:23:07+5:302015-12-08T00:23:07+5:30
तारापूर एमआयडीसीमधील एका फार्मास्युटीकल कारखान्यात झालेल्या छोट्याशा स्फोटाने आग भडकल्याने तीन कर्मचारी भाजून जबर जखमी झाले
बोईसर : तारापूर एमआयडीसीमधील एका फार्मास्युटीकल कारखान्यात झालेल्या छोट्याशा स्फोटाने आग भडकल्याने तीन कर्मचारी भाजून जबर जखमी झाले असून त्यांच्यावर पालघर येथील ढवळे हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना मुंबईच्या रुग्णालयात दाखल केले आहे. अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नामुळे आगीवर अल्पावधितच नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला.
औद्योगिक क्षेत्रातील टी-१३० या प्लॉटमधील ओम फार्मास्युटीकल या कारखान्यात रासायनिक प्रक्रिया सुरू असताना स्पार्क होऊन प्रथम स्फोट झाला नंतर त्यातून लागलेल्या आगीत क्वॉलिटी कंट्रोलर ओमकार विश्वकर्मा (४२), आॅपरेटर जयशंकर शुक्ला (३५) व सुनील रावत (२४) हे जबर जखमी झाले आहेत. आगीच्या धुराचे लोट गगनाला भिडले होते. त्यामुळे काही काळ परिसरात घबराटही माजलेली होती. (वार्ताहर)