गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांच्या बंगल्यावरील मारहाण प्रकरणातील तीन पोलिसांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 12:30 AM2020-10-06T00:30:17+5:302020-10-06T00:34:26+5:30

तब्बल सहा महिन्यांनंतर राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्याच्या आवारात एका अभियंत्याला मारहाण केल्याप्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी सोमवारी तीन पोलीस कर्मचाऱ्यांना अटक केली. अर्थात, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार गजाआड होणार का, असा सवाल भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी उपस्थित केला आहे.

Three policemen arrested in connection with assault on Housing Minister Awhad's bungalow | गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांच्या बंगल्यावरील मारहाण प्रकरणातील तीन पोलिसांना अटक

मुख्य सूत्रधाराला अटक कधी होणार?

Next
ठळक मुद्देमुख्य सूत्रधाराला अटक कधी होणार?भाजप आमदार निरंजन डावखरे यांचा सवाल

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील बंगल्याच्या आवारात अनंत करमुसे या अभियंत्याला झालेल्या कथित मारहाण प्रकरणातील सुरक्षा रक्षक विभागातील तीन पोलिसांना वर्तकनगर पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. या तिघांचीही जामीनावर सुटका झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाण्यातील घोडबंदर रोड भागात राहणाºया करमुसे यांनी गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांच्यासंदर्भात फेसबुकवर एक आक्षेपार्ह पोस्ट केली होती. यातूनच संतप्त झाल्याने आव्हाड यांच्या १० ते १५ समर्थकांसह पोलीस सुरक्षा रक्षकांनीही त्यांना जबर मारहाण केली होती. करमुसे यांना त्यांच्या घरातून नेऊन आव्हाड यांच्या बंगल्याच्या आवारात ही मारहाण केल्याबाबत करमुसे यांनी नंतर वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. सुरुवातीला याप्रकरणी काही जणांना अटक झाली होती. चौकशीमध्ये करमुसे यांच्या इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज मध्ये करमुसे यांना आव्हाड यांचे पोलीस अंगरक्षक लिप्ट मधून नेत असल्याचे उघड झाले होते. याच प्रकरणाची थेट राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडेही करमुसे कुटूंबीयांनी तक्रार केली होती. घटनेला सहा महिने उलटल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या पथकाने या प्रकरणातील तीन पोलिसांना सोमवारी अटक केली. याच प्रकरणातील अन्य एकाला तीन दिवसांपूर्वी अटक झाली होती. ५ एप्रिल २०२० रोजी रात्री ११.५० वाजण्याच्या सुमारास झालेल्या या प्रकरणात दोन खाकी तर दोन साध्या गणवेषातील पोलिसांनी घरी येऊन पोलीस ठाण्यात नेण्याच्या नावाखाली आव्हाड यांच्या ‘नाथ’ बंगल्यावर नेले. तिथेच १५ ते २० जणांनी पोलिसांची फायबर काठी तुटेपर्यत मारहाण केल्याचे करमुसे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले होते. अटक केलेल्या तिघांची नावे उघड करण्यात पोलिसांनी असमर्थता दर्शविली.
* अभियंता करमुसे यांच्या मारहाण प्रकरणात तीन पोलीस शिपायांवर अटकेची कारवाई केल्याबद्दल ठाणे पोलिसांचे भाजपचे आमदार तथा ठाणे जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी अभिनंदन केले आहे. मात्र, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार गजाआड होणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
अटकेतील तिन्ही पोलीस शिपायांचे करमुसे यांच्याबरोबर वैयक्तिक वाद नाहीत. त्यांनी करमुसे यांना कोणाच्या आदेशावरु न घरातून आणले. या संदर्भात कसून चौकशी होण्याची गरज आहे. त्यातून या प्रकरणातील मुख्य सुत्रधाराचा छडा लावण्याची आवश्यकता असल्याचेही डावखरे यांनी म्हटले आहे.

 

Web Title: Three policemen arrested in connection with assault on Housing Minister Awhad's bungalow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.