ठाणे महापालिकेला कचरामुक्त शहरांच्या यादीत थ्री स्टार रॅकींग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 06:39 PM2020-05-19T18:39:31+5:302020-05-19T18:40:36+5:30
कचरा व्यवस्थापनात केलेल्या बदलामुंळे ठाणे महापालिकेचा कचरा मुक्त शहरांच्या यादीत तिसरे रॅकींग मिळाले आहे. कचरा व्यवस्थापन, कचरा हाताळणी, कर्मशिअल कचºयावर प्रक्रिया करणे, नागरीकांच्या आलेल्या तक्रारींचे ७५ टक्यापर्यंत निवारण यामुळे पालिकेचा क्रमांक टु स्टारवरुन थ्री स्टारवर आला आहे.
ठाणे : कचरामुक्त शहरांच्या यादीत नवी मुंबईला फाईव्ह स्टॉर रॅकींग मिळाले असतांना ठाणे महापालिकेचा क्रमांकही मागील वेळेपेक्षा सुधारल्याचे दिसून आले आहे. मागील वेळेस टु स्टार असलेल्या ठाणे महापालिकेला यंदा थ्री स्टार रेटींग मिळाले आहे. कचरा व्यवस्थापनामध्ये केलेल्या सुधारणेमुळे, तक्रारी सोडविण्यामध्ये आणि कचऱ्याची योग्य रितीने हाताळणी केल्यामुळे पालिकेचा हा क्रमांक सुधारल्याची माहिती आता समोर आली आहे.
केंद्र सरकारच्या वतीने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत घेण्यात आलेल्या या स्पर्धेत दैनंदिन सफाई, सिंगल प्लास्टिक यूज़ वरील बंदी, नालेसफाई, वेस्ट मैनेजमेंट यावर केंद्र सरकारचा भर होता. त्यानुसार ठाणे महापालिकेचा क्रमांकही यंदा सुधारल्याचे दिसून आले आहे. महापालिका हद्दीत आजच्या घडीला ७५० मेट्रीक टन कचरा निर्माण होतो. डम्पींग ग्रांऊड वगळता पालिकेचे कचरा व्यवस्थापन योग्य रितीने हाताळल्याचे दिसून आले आहे. शहरात निर्माण होणारा कचरा रोजच्या रोज उचलला जात आहे. त्याचे वर्गीकरणही केले जात असल्याचा दावा पालिकेने केला आहे. तसेच त्याची हाताळणीही योग्य पध्दतीने केली जात आहे. याशिवाय घंटागाड्यांवर जीपीएस सीस्टम बसविण्यात आल्याने कचºयाची नित्यनियमाने उचलण्याची व्यवस्था केली जात आहे. कचरा कलेक्शन, कचरा निवारणाचे स्टेज आदी प्रकारात पालिकेने आघाडी घेतली आहे. कचरा व्यवस्थापनाची योग्य अशी साखळी तयार केली आहे. तसेच आलेल्या तक्रारींचे निवारण करण्याचे प्रमाणही वाढले आहे. तर यातील काही प्रमुख कारणे पालिकेने सांगितली आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने कचरा कलेक्शनच्या सीसस्टमध्ये बदल झाला, ई व्हॅल्युएशनचे प्रमाण हे ८० टक्के होते, ते आता ९६ टक्यांवर आले आहे, सोसायटीमधली कचरा वर्गीकरणाचे प्रमाण ५० टक्यांवरुन ८० टक्यांवर आला आहे, कर्मशीअल एरीयात साफसफाईचे ही दिवसातून वेळा केली गेली आहे, त्याचाही परिणाम झाल्याचे दिसून आले. शहराच्या विविध भागात प्लास्टीकचे लीटर बीन्स बसविण्यात आले आहेत, त्याचा फायदा झाला. बल्क वेस्ट जनरेटर मध्ये कमर्शिअलवाल्यांचा कचºयावर १०० टक्के प्रक्रिया केली जाते, सेवा शुल्क वसुल करण्यातही आघाडी, जुने डम्पींग ग्राऊंड बंद करण्याची प्रक्रिया सुरु केली, तसेच नागरीकांचा कौलही केंद्राच्या कमिटीने घेतला होता, त्यातही महापालिका ७५ टक्क्यांवर आली आहे. तसेच नागरीकांच्या तक्रारी सोडविण्याचे प्रमाणही ७५ टक्के आल्याने या सर्वांमध्ये घेतलेल्या आघाडीमुळेच पालिकेला थ्री स्टार रेटींग मिळाले आहे.