भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली एक महिला मयत,तीन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 12:27 AM2018-07-25T00:27:33+5:302018-07-25T00:34:25+5:30
भिवंडी : तालूक्यातील खाडीपार -रसुलाबाग भागात एकता चौकजवळ तीन मजली इमारत रात्री नऊ वाजताच्या सुमारास शेजारील चाळीवर कोसळली असुन या दुर्घटनेत एक महिला मयत असून एका मुलीसह दोन महिला असे एकुण तीनजण जखमी झाले असून त्यांना शहरातील इंदिरांगांधी उपजिल्हा रूग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.इमारतीच्या ढिगाऱ्याखाली याकूब कुटूंबातील तीन जण अडकल्याची माहिती परिसरांतील लोकांनी दिली असून त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
खैरूनिसा इस्माईल सय्यद(२५)या महिलेचा ढिगाºयाखाली मृत्यु झाला असून कुमारी शेख मरीयम जरार(९),साफीयाबी युसुफ सरदार(६०)मेहरूनिस्सा शेख (४०)या तीनजणी इमारतीच्या दुर्घटनेत जखमी झाल्या आहेत. जखमींवर इंदिरागांधी रूग्णालयांत उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. सदर इमारत ही सात वर्षापुर्वी फौजान सुसे या बिल्डरने बांधली असून ती गेल्या महिन्यात अनाधिकृत व धोकादायक इमारत म्हणून खोणी ग्रामपंचायतीने घोषित केली आहे.ही इमारत पाडण्यासाठी ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने जिल्हाधिकारी व एमएमआरडीए यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता.परंतू संबधित विभागाने कोणतीही कारवाई केली नाही,अशी माहिती खोणी ग्रामपंचायतीचे सरपंच अल्ताफ शेख याने घटनास्थळी दिली.आज दुपारी या इमारतीची भिंत कोसळल्याने दुपारी खोणी ग्रामपंचायतीचे सरपंच अल्ताफ व ग्रामपंचायत सदस्यांनी मिळून घेतलेल्या मिटींगनंतर या इमारतीतील सर्व कुटूंबांना बाहेर काढले.त्यामुळे प्राणहानी टळली आहे. परंतू याकुब कुटूंब इमारती बाहेर न पडल्याने त्यांच्या घरातील तीन सदस्य ढिगाºयाखाली अडकल्याची भिती नागरिकांनी व्यक्त केली. आज रात्री नऊ वाजता सदर इमारतीचा पुढील भाग शेजारील चाळीवर कोसळल्याने चाळीतील लहान मुलीसह तीन महिला जखमी झाल्या आहेत.इमारतीचा काही भाग शौचालयांवर कोसळल्याने त्यामधून दोन पुरूषांना नागरिकांनी सुखरूप बाहेर काढले. दुर्घटनेनंतर पालिकेचे आपत्त्कालिन व्यवस्थापन व अग्निशामकदलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना ढिगाºयाबाहेर काढून उपचारासाठी पाठविले. दरम्यान तहसिलदार शशिकांत गायकवाड यांनी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलास पाचारण केले असून ते रात्री ११-३० वाजता घटनास्थळी पोहोचून त्यांनी मदतकार्य सुरू केले. दुर्घटनेनंतर परिसरांतील लोकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.