तीन हजार ६२१ एमएलडी पाणी मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:39 AM2021-04-18T04:39:47+5:302021-04-18T04:39:47+5:30
ठाणे : जिल्ह्यातील पाणीकपात थांबवल्याने मुंबईसहजिल्हाभरातील दोन कोटी ८० लाख लोकसंख्येला त्यांचा तीन हजार ६२१ एमएलडी हा रोजचा ...
ठाणे : जिल्ह्यातील पाणीकपात थांबवल्याने मुंबईसहजिल्हाभरातील दोन कोटी ८० लाख लोकसंख्येला त्यांचा तीन हजार ६२१ एमएलडी हा रोजचा मंजूर पाणी कोटा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्ह्यातील भातसा या सर्वाधिक मोठ्या जलाशयासह बारवी धरण, आंध्रचे पाणी उल्हास नदीद्वारे, मोरबे, पिसे, हेटवणे आदी धरणातून बृहन्मुंबईसह ठाणे, कल्याण - डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी आणि मीरा-भाईंदर या सहा महापालिका, अंबरनाथ, कुळगाव - बदलापूर या दोन नगर परिषदा आणि काही ग्रामीण भागाला पाणीपुरवठा होत आहे. एमआयडीसी, एमजेपी, शहाड स्टेमघर प्राधिकरण आदी संस्थांना आता जिल्ह्यातील शहरांमधील दोन कोटी ८० लाख लोकसंख्येला रोज तीन हजार ६२२ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा करता येणार आहे.
--------------
मुंबई महापालिकेला भातसा मोडकसागर, अपर वैतरणा, मध्य वैतरणा धरणातून पाणीपुरवठा होतो. याप्रमाणेच ठाणे मनपाला ४२२ एमएलडी पाणीपुरवठा भातसा, शहाड स्टेमघर, एमआयडीसी आणि पिसे धरणातून होतो. नवी मुंबईला ३३० एमएलडी पाणी मोरबे, हेटवणे आणि बारवी धरणातून मिळत आहे. कल्याण -डोंबिवली मनपाला २६४ एमएलडी, भिवंडीला २१० एमएलडी, मीरा-भाईंदरला ९१ एमएलडी पाणीपुरवठा शहाड स्टेमघर व एमआयडीसीद्वारे उल्हास नदीतून होतो. बदलापूरला ३७ एमएलडी, अंबरनाथला ५५ आणि उल्हासनगरला १२० एमएलडी पाणी बारवी धरण व उल्हास नदीतून एमआयडीसी, महाराष्ट्र जीवन (एमजेपी) प्राधिकरणाकडून रोज मिळत आहे. एमआयडीला १६० एमएलडी पाणीपुरवठाही बारवीतून होत आहे. शहरांच्या वाढीव लोकसंख्येस पाणीपुरवठ्यासाठी बारवी धरणाची उंची दोन मीटरने वाढवली. यामुळे या धरणात आता भरपूर पाणीसाठा आहे.