जिल्ह्यातील आरटीईच्या तीन हजार ९५७ बालकांचे पहिल्या फेरीतील प्रवेश पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 07:41 PM2019-05-16T19:41:45+5:302019-05-16T19:47:12+5:30
आरटीईव्दारे जिल्ह्यातील ६५२ शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश आरक्षित ठेवलेले आहेत. त्यासाठी १६ हजार ३२६ बालकांनी प्रवेश अर्ज दाखल केले होते. त्यातील गरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागासवर्गीय आदी प्रवर्गातील १३ हजार ४०० बालकांची या आरक्षित जागेवरील प्रवेशासाठी निवड झाली आहे. यातून पहिल्या फेरीच्या प्रवेशासाठी पाच हजार ८९६ बालकांची निवड झाली.
ठाणे : ‘शिक्षणाचा हक्क’ (आरटीई) या कायद्याखाली जिल्ह्यातील अनुदानीत, विना अनुदानतीत, स्वयंअर्थसहाय्य आदी उच्च दर्जाचे शिक्षण देणाऱ्या ६५२ शाळांमध्ये पहिल्या फेरीत पाच हजार ८९६ बालकांना पहिली ते केजीच्या वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. यापैकी पहिल्या फेरित तीन हजार ९५७ बालकांचा प्रवेश निश्चित झाला. उर्वरित विद्यार्थ्यांना २० मेनंतर होणा-या दुस-या फेरीत प्रवेशासाठी निवड केली जाणार आहे.
आरटीईव्दारे जिल्ह्यातील ६५२ शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश आरक्षित ठेवलेले आहेत. त्यासाठी १६ हजार ३२६ बालकांनी प्रवेश अर्ज दाखल केले होते. त्यातील गरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागासवर्गीय आदी प्रवर्गातील १३ हजार ४०० बालकांची या आरक्षित जागेवरील प्रवेशासाठी निवड झाली आहे. यातून पहिल्या फेरीच्या प्रवेशासाठी पाच हजार ८९६ बालकांची निवड झाली. यातील चार हजार ६२० विद्यार्थी - विद्यार्थिनींची पहिलीच्या वर्गासाठी झाली होती. यातून तीन हजार १९० बालकांचे आता पहिलीच्या वर्गात प्रवेश झाले. उर्वरित २४ बालकांचे प्रवेश अर्ज विविध कागदपत्रांच्या उपलब्धते अभावी रद्द झाले. तर एक हजार ४०५ बालकांचे संबंधीत पालक दिलेल्या शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी गेलेच नाही.
या पहिलीच्या वर्गातील प्रवेशाप्रमाणेच पूर्व प्राथमिक म्हणजे केजीच्या वर्गातील प्रवेशासाठी एक हजार २७६ विद्यार्थी - विद्यार्थिनींची पहिल्या फेरीत निवड झाली होती. त्यातून ७६७ बालकांचे प्रवेश दिलेल्या शाळांवर निश्चित झाले. नवी मुंबईतील तीन आणि ठाणे येथील दोन विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द झाले. उर्वरित ५०२ बालकांचे वडील दिलेल्या शाळांवर जावून बालकांचे प्रवेश घेऊ शकले नसल्याचे निदर्शनात आले. यामध्ये मीरा भार्इंदर मनपा क्षेत्रातील २२१, ठाणे मनपा क्षेत्रातील १०३ विद्यार्थी, ठाणे मनपा १ मधील ६५, अंबरनाथ ५२, भिवंडी मनपातील २६, कल्याण ग्रामीण ११, कल्याण शहर २ , उल्हासनगर १२ आणि शहापूर येथील दहा विद्यार्थ्यांचे पालक दिलेल्या शाळांवर प्रवेशासाठी गेले नाही. यामुळे या बालकांचे प्रवेश रखडले आहेत.
पहिल्या सोडतमधील या बालकांचे निश्चित झालेले प्रवेश एक किमी. अंतरावरील शाळांमध्ये झाले आहेत. यानंतर दुसºया सोडतमध्ये १ ते तीन किमी.च्या अंतरावरील शाळांमधील प्रवेशासाठी बालकांची निवड होणार आहे. या दुसºया सोडतीमधील विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्यानंतरही विद्यार्थी शिल्लक राहिल्यास तीन किमी. पेक्षा अधीक लांबच्या शाळांमधील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची निवड होणार आहे. झाली आहे. जिल्ह्याभरात ११ हजार ७७६ प्रवेश पहिलीच्या वर्गात होणार आहेत. त्यापैकी पहिल्या सोडतव्दारे तीन हजार १९० बालकांचे पहिलीच्या वर्गात प्रवेश झाल आहेत.