प्लास्टिक बाळगणाऱ्यांविरुद्ध कारवाई न करण्यासाठी लाच स्वीकारणा-या ठामपाच्या तीन कर्मचाऱ्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 10:50 PM2019-12-18T22:50:36+5:302019-12-18T22:52:40+5:30

प्लास्टिक बाळगणा-या बेकरी चालकावर कारवाई न करण्यासाठी तीन हजारांची लाच स्वीकारणारे ठाणे महापालिकेचे स्वच्छता पर्यवेक्षक संजय मगर, भारत सोनवणे आणि शाहीर खेंगले या तिघांना तसेच नविन वीज मीटर बसविण्यासाठी आठ हजारांची लाच स्वीकारणा-या सहायक वीज अभियंत्यालाही ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १८ डिसेंबर रोजी अटक केली आहे.

Three TMC worker arrested for accepting bribe for not taking action against plastic holders | प्लास्टिक बाळगणाऱ्यांविरुद्ध कारवाई न करण्यासाठी लाच स्वीकारणा-या ठामपाच्या तीन कर्मचाऱ्यांना अटक

तिघांनाही रंगेहाथ अटक

Next
ठळक मुद्देवीज वितरण विभागाच्या सहायक अभियंत्यालाही आठ हजारांची लाच स्वीकारतांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : प्लास्टिक बाळगणा-या बेकरी चालकावर कारवाई न करण्यासाठी पाच हजारांची मागणी करून तीन हजारांची लाच स्वीकारणारेठाणे महापालिकेचे स्वच्छता पर्यवेक्षक संजय मगर, भारत सोनवणे आणि शाहीर खेंगले या तिघांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी दुपारी अटक केली. त्यांच्याविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अन्य एका कारवाईमध्ये वीज वितरण विभागाच्या सहायक अभियंत्यालाही आठ हजारांची लाच स्वीकारतांना अटक करण्यात आली आहे.
ठाणे रेल्वेस्थानक रोडवरील गौतम शाळेच्या प्रवेशद्वाराच्या बाजूला असलेल्या एका बेकरीचालकाला ठाणे महापालिकेच्या या तीन कर्मचाºयांनी प्लास्टिकवर कारवाई न करण्यासाठी १७ डिसेंबर रोजी पाच हजारांची मागणी केली. तडजोडीअंती तीन हजार रुपये देण्याचे ठरले. याप्रकरणी या बेकरीचालकाने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १८ डिसेंबर रोजी दुपारी ११.४५ वाजण्याच्या सुमारास सापळा रचला. त्यावेळी तीन हजारांची लाच स्वीकारताना मगर, सोनवणे आणि खेंगले या तिघांनाही रंगेहाथ अटक करण्यात आली.
-------
महावितरणच्या अभियंत्यास अटक
दुसºया कारवाईत, कोपरी येथील एका गाळ्यामध्ये नवीन विद्युतमीटर बसवून देण्यासाठी आठ हजारांची लाच स्वीकारणाºया वीज वितरण कंपनीचा सहायक अभियंता सचिन शेडगे याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी सायंकाळी रंगेहाथ अटक केली. कोपरीतील आनंदनगर चेकनाका येथील एका दुकानात नवीन वीजमीटरची जोडणी करण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या कोपरी उपविभागाचे सहायक अभियंता शेडगे यांच्याकडे या गाळ्याचा मालक पाठपुरावा करीत होता. अखेर, त्याने २० हजारांमध्ये नवीन जोडणी करून देण्याचे मान्य केले. त्यापोटी १२ हजारांची रक्कम त्याने आधीच स्वीकारली. त्यानंतर, उर्वरित आठ हजारांची रक्कम दिल्यानंतर मीटर बसवून देण्याचे त्याने मान्य केले. दरम्यान, या गाळामालकाने ११ डिसेंबर रोजी यासंबंधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर, उर्वरित आठ हजारांची रक्कम १८ डिसेंबर रोजी देण्याचे ठरल्यानंतर सापळा रचून आरोपीला अटक करण्यात आली.

Web Title: Three TMC worker arrested for accepting bribe for not taking action against plastic holders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.