ठाण्यात होरायझन स्कूलजवळील तीन वाहनांना आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2022 16:33 IST2022-11-14T16:27:13+5:302022-11-14T16:33:30+5:30
न्यू होरायझन स्कूलच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर तीन मोटरकार उभ्या होत्या.

ठाण्यात होरायझन स्कूलजवळील तीन वाहनांना आग
ठाणे : हरदास नगर, वसंत लॉन्सच्या समोरील वसंत फिओ ना सोसायटीच्या बाजूला उभ्या असलेल्या तीन वाहनांना आग लागल्याची घटना सोमवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
न्यू होरायझन स्कूलच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर तीन मोटरकार उभ्या होत्या. १४ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास या तीन वाहनाना अचानक आग लागली. ही माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यासह अग्निशमन दलाच्या जवानानी धाव घेत ही आग आटोक्यात आणली.
या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, या आगीमध्ये सोमनाथ सकट आणि परवेश चौधरी यांच्यासह तिघांच्या वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.