ठाण्यात पुन्हा दुचाकी जळीतकांड, इमारतीचीही सुरक्षा वाºयावर, कोपरीतील ठाणेकरवाडीतील तीन दुचाकींना आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 04:42 AM2017-09-15T04:42:41+5:302017-09-15T04:42:58+5:30
ठाण्यात पुन्हा एकदा दुचाकी पेटवून देण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. कोपरीतील ठाणेकरवाडी परिसरातील तीन दुचाकींना आग लावण्याचा प्रकार गुरुवारी पहाटे २.३० ते ३.३० वाजण्याच्या सुमारास घडला. या दुचाकींना आग कशामुळे लागली, याचे कारण समजू शकले नसल्याचे कोपरी पोलिसांनी सांगितले.
ठाणे : ठाण्यात पुन्हा एकदा दुचाकी पेटवून देण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. कोपरीतील ठाणेकरवाडी परिसरातील तीन दुचाकींना आग लावण्याचा प्रकार गुरुवारी पहाटे २.३० ते ३.३० वाजण्याच्या सुमारास घडला. या दुचाकींना आग कशामुळे लागली, याचे कारण समजू शकले नसल्याचे कोपरी पोलिसांनी सांगितले.
शांतीनगरमधील गोमती बंगल्यासमोरील ‘दत्तविजय सोसायटी’ या इमारतीच्या आवारात उभ्या असलेल्या तीन दुचाकी गुरुवारी पहाटे अज्ञाताने पेटवून दिल्या. एका फायर इंजीनच्या मदतीने ठाणे पालिकेच्या कोपरी केंद्रावरील अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.
येथील योगेश कार्ले यांची एक, तर जे. सुब्रह्मण्यम यांच्या दोन दुचाकी जळाल्याची माहिती ठाणे पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. ‘दत्तविजय सोसायटी’ला सुरक्षारक्षक नसून दोन सीसीटीव्हींपैकी एकच चालू आहे. त्यामुळे इमारतीची सुरक्षाही वाºयावर आहे. परंतु, त्यात घटना कैद झाली नसल्याचे कोपरी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक एस.डी. कोर्डे यांनी सांगितले. उपनिरीक्षक सुजाता जगताप अधिक तपास करीत आहेत. दोन महिन्यांपूर्वी ठाण्यातील विविध ठिकाणी दुचाकी जाळल्याच्या घटना घडल्या होत्या.
दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या घटना...
खोपट परिसरातील सिद्धेश्वर तलाव भागात शिवसेना पदाधिकाºयाच्या दुचाकीसह चार ते पाच वाहनांना तिथल्याच काही तरुणांनी आग लावल्याचा प्रकार घडला होता.
त्याआधी ठाण्याच्या सॅटिसखालील सात ते आठ दुचाकींना एका माथेफिरूने दारूच्या नशेत आग लावली. तर, लोकमान्यनगर येथेही अशाच प्रकारे काही रिक्षांना आग लावण्यात आली होती. सिद्धेश्वर तलाव, सॅटीस या ठिकाणच्या घटनेतील आरोपींना पोलिसांनी अटक केली. परंतु, लोकमान्यनगरच्या आरोपींचा शोध लागलेला नाही.