ठामपा अधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे?

By admin | Published: May 3, 2017 05:51 AM2017-05-03T05:51:16+5:302017-05-03T05:51:16+5:30

प्रसंगी धोका पत्करून, धमक्यांना भीक न घालता विकासकामे करायची; नेत्यांनी त्याचे राजकीय श्रेय घ्यायचे, एकीकडे कौतुकाची

Thumpa official resigns? | ठामपा अधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे?

ठामपा अधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे?

Next

ठाणे : प्रसंगी धोका पत्करून, धमक्यांना भीक न घालता विकासकामे करायची; नेत्यांनी त्याचे राजकीय श्रेय घ्यायचे, एकीकडे कौतुकाची थाप द्यायची आणि महासभेत मात्र शेलक्या शब्दांत उद्धार करायचा यामुळे ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल आणि अन्य अधिकारी विलक्षण नाराज झाले आहेत. पालिकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत यातील अनेक अधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देण्याचा पवित्रा घेतला, तर खुद्द आयुक्त संजीव जयस्वाल हेही व्यथित झाल्याने काही काळ वातावरण तापले होते.
ठाण्याच्या अर्थसंकल्पात प्रशासनाने सुचवलेली करवाढ सर्वपक्षीय नगरसेवकांनी फेटाळून लावल्याने उत्पन्नात ४७० कोटींचा खड्डा पडणार आहे. त्यामुळे नव्याने एकही विकासकाम हाती घेता येणार नाही. त्यामुळे ठाणे पालिकेचा गाडा पुन्हा रूतून बसण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. त्यावर कसा मार्ग काढता येईल, यावर चर्चा करण्यासाठी आयुक्तांनी मंगळवारी बैठक घेतली. त्यात मूळ मुद्दयावर चर्चा करताकरता अनेक अधिकाऱ्यांनी महासभेत झालेल्या टीकेचा मुद्दा उपस्थित केला. उत्पन्न वाढवण्यासाठी नगरसेवक करवाढ करू देत नाहीत, थकबाकी वसूल करायची ठरवली तर ती रोखतात, दबाव आणतात, अशा स्थितीत कामे करायची कशी हा त्यांचा प्रश्न होता. त्यानंतरही शेलक्या शब्दांत आमचा उद्धार होणार असेल तर आम्ही राजीमाना देतो. अशी नोकरीच करायला नको, अशा तीव्र शब्दांत त्यांनी भावना मांडल्या.
ठाणे महापालिका निवडणुकीनंतर प्रशासनासोबत खास करून आयुक्तांसोबत शिवसेनेचे शीतयुद्ध सुरू झाल्याने प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांत संघर्ष उभा ठाकला आहे. यापूर्वी केलेल्या कामांनाही पक्षीय लेबल लावले जात असल्याने अधिकारी अस्वस्थ आहेत. सततच्या कोंडीमुळे आयुक्त संजीव जयस्वाल सर्वाधिक व्यथित आहेत. ठाण्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात विकासकामे केली. रस्ता रु ंदीकरणामुळे सर्वांनीच पाठीवर कौतुकाची थाप मारली. डबघाईला आलेल्या पालिकेच्या तिजोरीत घसघशीत उत्पन्नाची वाढ केली. त्यानंतरही जर नगरसेवक अशी टीका करणार असतील; तर काम तरी कशासाठी करायचे, असा निरवानिरवीचा सूर आयÞुक्तांनी बैठकीत लावल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. त्यामुळे बैठकीतील वातावरणच बदलले. अनेक अधिकाऱ्यांनी राजीनाम्याचा पवित्रा घेतला. अखेर काही ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी नरमाईचा सूर लावला आणि समजूत काढली. अखेर महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या कानावर ही नाराजी घालायची आणि या भावना पोचवायच्या असे ठरल्याचे समजते. मात्र एकही अधिकारी रात्री उशिरापर्यंत याबाबत अधिकृतपणे बोलण्यास तयार नव्हता.
अधिकाऱ्यांच्या या राजीनाम्याच्या पवित्र्यातून शिवसेनेवर दबाव आणण्याचा प्रयत्न प्रशासनाने केल्याची चर्चा नंतर पालिका वर्तुळात रंगली होती. शिवसेनेच्या काही नेत्यांनी खाजगीत बोलताना अधिकाऱ्यांच्या सामूहिक राजीनाम्याच्या पवित्र्यातून आयुक्तांनी अप्रत्यक्षरित्या शिवसेनेविरोधात वातावरणनिर्मितीचा प्रयत्न केल्याची टीका केली. मुख्यमंत्र्यांशी त्यांचे असलेले संबंध याला कारणीभूत असल्याचा दावाही त्यांनी केला. यातून भाजपा वेगळ््या मार्गाने शिवसेनेवर दबाव आणत आहे, असा आरोपही त्यांनी केला. (प्रतिनिधी)

शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर नाराजी

ठाणे महापालिका निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याबद्दल गौरवोद््गार काढले होते. मी ठरवून ्शा अधिकाऱ्याला ठाण्यात पाठवल्याचा उल्लेख त्यांनी केला. पण जयस्वाल यांना ठार मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याने त्यांनी मध्यरात्री मला फोन करून कुटुंबाबाबत चिंता वाटत असल्याचा गौप्यस्फोट करून खळबळ उडवून दिली होती.

मुख्यमंत्र्यांचा रोख शिवसेनेवर असल्याने त्या पक्षाचे नेते संतापले. भाजपासोबत राजकीय वाद होता. पण आयुक्तांचा शिवसेनेसोबत राजकीय वापर झाल्याने त्यांचे आयुक्तांसोबतचे संबंध बिघडले. निकालानंतर जयस्वाल यांची उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासोबतची छायाचित्रे प्रसिद्ध झाली. पण शिवसेनेसोबतचे त्यांचे संबंध सुधारले नाहीत.
उलट रस्ता रूंदीकरणाच्या मुद्द्यावर त्यांचा महापौरांशी संघर्ष झाला. पुढे करवाढ पूर्णपणे फेटाळून शिवसेनेने त्यांच्यावरील रागाचे उट्टे काढल्याची चर्चा रंगली. त्यामुळे कमालीचे नाराज झालेल्या आयुक्तांनी निरवानिरवीची भाषा केल्याचे सांगितले जाते.

Web Title: Thumpa official resigns?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.