ठाण्यात नितीन ते कॅडबरी उड्डाणपुलाखाली रंगला स्केटिंगचा थरार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 07:53 PM2018-01-18T19:53:50+5:302018-01-18T19:56:42+5:30

The Thunder of Skating under the Cadbury flyover in Thane from Nitin | ठाण्यात नितीन ते कॅडबरी उड्डाणपुलाखाली रंगला स्केटिंगचा थरार!

ठाण्यात नितीन ते कॅडबरी उड्डाणपुलाखाली रंगला स्केटिंगचा थरार!

googlenewsNext
ठळक मुद्देरायसा संघाला विजेतेपद, तर स्पीड ट्रॅक या संघाला उपविजेतेपद एकूण १४ गटांत या स्पर्धा


ठाणे : ‘माझे ठाणे, सुंदर ठाणे’ या संकल्पनेतून नितीन कंपनी ते कॅडबरी उड्डाणपुलाखाली सुशोभीकरण करण्यात आले असून या परिसरात नुकत्याच १०० मी स्पिंट स्केटिंग स्पर्धेचा थरार ठाणेकर नागरिकांनी अनुभवला. या वेळी रायसा संघाला विजेतेपद, तर स्पीड ट्रॅक या संघाला उपविजेतेपद देऊन गौरवण्यात आले.
ईएसपीएम स्पोर्ट्स आणि रायसा स्केटिंग क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी एकूण १४ गटांत या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. स्केटिंगची १०० मी स्पिंट या स्पर्धेत रिदेय शर्मा, नूरजहाँ लुबल, आरव थार, आन्वी सिंघल, आर्यमन कांडू, आयूष सिंग, अभिनव वाघमारे, साई सातपुते, रूद्र प्रकाश, हिमानी भट, जहान शिंदे, कृष्णा पटेल, पार्थ कुलकर्णी, सायना जाधव या खेळाडूंनी सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. विजेत्या संघांना ठाणे जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे उपाध्यक्ष प्रमोद कुलकर्णी, छत्रपती पुरस्कार विजेते प्रशिक्षक दत्ता चव्हाण, नगरसेविका रुचिता मोरे, ठामपा परिवहन सदस्य राजेश मोरे, पत्रकार दिलीप सपाटे, विलास मोरे, ईएसपीएमचे डायरेक्टर प्रदीप महाले व मारुती चव्हाण, अजिंक्य हजारे आणि प्रणीत मरचंडे, प्राध्यापक एकनाथ पवळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत गौरवले.
 

Web Title: The Thunder of Skating under the Cadbury flyover in Thane from Nitin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.