ठाण्यात ढगांच्या गडगडाट, पावसाची जोरदार बॅटिंग; तासभरात २०.०७ मिमी शहरात नोंद!
By अजित मांडके | Published: October 14, 2022 06:23 PM2022-10-14T18:23:29+5:302022-10-14T19:12:48+5:30
Thane : शुक्रवारी सकाळपासून आकाश स्वच्छ होते. दुपारी अचानक ४ वाजण्याच्या सुमारास ढगांच्या गडगडाट पावसाला सुरुवात झाली.
ठाणे : ठाण्यात शुक्रवारी दुपारी अचानक ढगांच्या गडगडाटात पावसाने हजेरी लावत जोरदार बॅटिंग केली. शहरामध्ये तासभरात २०.०७ मिमी इतकी पाऊस झाला असून कळवा-खारेगाव परिसरातील दत्तवाडीत पाणी साचले होते. तर दिव्यात झाड पडल्याची घटना समोर आली आहे. हा पाऊस सुरुवातीला होणारा आहे की परतीचा अशी आता रंगू लागली आहे.
शुक्रवारी सकाळपासून आकाश स्वच्छ होते. दुपारी अचानक ४ वाजण्याच्या सुमारास ढगांच्या गडगडाट पावसाला सुरुवात झाली. तासभर बरसलेल्या पावसाने ढगांचा गडगडाटात जोरदार बॅटिंग केली. अचानक आलेल्या पावसामुळे सर्वांची धांदल उडाली होती. त्यातच तासभरात तब्बल २०.०७ मिमी पाऊस पडल्याची नोंद शहरात झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
तसेच, शहरात पाणी साचणे आणि झाड पडण्याची प्रत्येकी एक घटना घडली असून झाड कापून रस्त्याच्या बाजूला केले. या पडलेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे अजून पावसाने काळोख केल्याने जोरदार पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही.