ठाण्यात वाहनांचा धूरचधूर

By admin | Published: November 2, 2015 01:58 AM2015-11-02T01:58:22+5:302015-11-02T01:58:22+5:30

ठाण्यात वाहनांची नोंदणी १७ लाख ८४ हजार ८४९ झाली आहे. त्यामुळे शहरात वाहनांची वर्दळ वाढली आहे. ठाणे शहराची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार

Thunderstorms in Thane | ठाण्यात वाहनांचा धूरचधूर

ठाण्यात वाहनांचा धूरचधूर

Next

घोडबंदर : ठाण्यात वाहनांची नोंदणी १७ लाख ८४ हजार ८४९ झाली आहे. त्यामुळे शहरात वाहनांची वर्दळ वाढली आहे. ठाणे शहराची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार १८ लाख ६८ हजार आहे. आगामी काळात हा आकडा प्रत्येक ठाणेकराच्या मागे एक वाहन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहनांच्या वाढत्या आकडेवारीने प्रदूषण वाढून फुफफुसाच्या आजाराला निमंत्रण मिळणार असल्याचा धोका आहे.
भंगार झालेली वाहने रंगरंगोटी करून चालवली जात आहेत तसेच अनेक रिक्षा एकाच परमिटवर चालवत आहेत. हे अनेकदा आरटीओने केलेल्या कारवाईतून सिद्ध झाले आहे. या रिक्षांमुळेदेखील प्रदूषण वाढण्यास मदत होत आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: Thunderstorms in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.