टिकटॉक , फेसबुकद्वारे एड्सविषयक जनजागृती; बेस्ट व्हिडीओ करणाऱ्यांचा गौरव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 11:52 PM2019-11-30T23:52:27+5:302019-11-30T23:53:19+5:30

जागतिक एड्स दिनाची यंदाची थीम ‘समाज बदल घडवू शकतो’ ही आहे.

 Ticketalk, AIDS awareness through Facebook; The glory of the best video makers | टिकटॉक , फेसबुकद्वारे एड्सविषयक जनजागृती; बेस्ट व्हिडीओ करणाऱ्यांचा गौरव

टिकटॉक , फेसबुकद्वारे एड्सविषयक जनजागृती; बेस्ट व्हिडीओ करणाऱ्यांचा गौरव

Next

ठाणे : ठाणे जिल्हा एड्स कार्यक्रम नियंत्रण विभागाने जिल्ह्यातील महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याबरोबर एड्सबाबत जनजागृतीसाठी सोशल मीडियाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, जिल्ह्यातील ५० महाविद्यालयांशी पत्रव्यवहार करून टिकटॉक, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, यू-ट्युबद्वारे एचआयव्ही (एड्स) विषयक जनजागृतीसाठी प्रभावी व्हिडीओ किंवा आॅडिओ क्लिप बनवण्याचे आवाहन केले आहे. बेस्ट व्हिडीओ किंवा आॅडिओ निवडून त्या महाविद्यालयासह विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जागतिक एड्स दिनाची यंदाची थीम ‘समाज बदल घडवू शकतो’ ही आहे. पंधरा दिवस चालणाºया या कार्यक्रमात अतिजोखमीचे गट, ठिकाण, स्थलांतरित कामगारांच्या रहिवासी तसेच कामाच्या ठिकाणी, मुख्य चौक, बाजारपेठ, गर्दीच्या ठिकाणी व्यापक जनजागृती करून जिल्हा व तालुकास्तरावरही मोहीम अधिक प्रभावी करून जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचून एचआयव्ही तपासणीकरिता प्रोत्साहित केले जाणार आहे. तसेच जे रुग्ण उपचारांपासून दुरावले आहेत, उपचारांत खंड पडलेला आहे, अशा सर्वांना पुन्हा राष्टÑीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाशी जोडण्याकरिता ही जनजागृती केली जाणार आहे.
युवावर्ग हा सृजनशील असल्यामुळे विविध उपक्रमांच्या माध्यमातून युवावर्गासोबत जनजागृती केली जाणार आहे.
तर, महाविद्यालयात रेड रिबन क्लब सुरू असून त्याच्या माध्यमातून आंतरराष्टÑीय युवक, एड्स हे कार्यक्रम साजरे केले जातात. तसेच रक्तदान शिबिर घेऊन याच माध्यमातून जनजागृतीही केली जात आहे.
या जागतिक एड्स दिनाच्या पंधरवड्यात येणाºया व्हिडीओ किंवा आॅडिओ क्लिपमधील कोणता व्हिडीओ हा जनजागृतीसाठी बेस्ट आहे, त्याची निवड केली जाणार आहे. त्यामुळे तरुणाईने एड्स्वर व्हिडीओ क्लिप तयार करण्याचे आवाहन जिल्हा एड्स कार्यक्रम नियंत्रण विभागाच्या सूत्राने केले आहे.

महाराष्टÑ राज्य एड्स नियंत्रण संस्थेचे प्रकल्प संचालक तुकाराम मुंढे यांच्या संकल्पनेतून जिल्हास्तरावर जनजागृतीकरिता सोशल मीडिया यासारख्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. त्यातून ९०:९०:९० (९० टक्के लोकांची एचआयव्ही तपासणी करणे, ९० टक्के एचआयव्हीबाधित रुग्णांना एआरटी औषधोपचार सुरू करणे, ९० टक्के एचआयव्हीबाधित रुग्णांचे एआरटी औषधांमध्ये सातत्य राखणे) हे उद्दिष्ट गाठायचे आहे.

Web Title:  Ticketalk, AIDS awareness through Facebook; The glory of the best video makers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.