ठाण्यात अनाथ, निराधार बालकांना राखी बांधून दिली बहिणीची माया
By सुरेश लोखंडे | Published: August 31, 2023 05:33 PM2023-08-31T17:33:49+5:302023-08-31T17:34:41+5:30
एक राखी वंचित निराधार भावांसाठी हा कार्यक्रम टिटवाला येथील बाल भवनमध्ये साजरा करण्यात आला.
ठाणे : जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या निराधार बालकांना बहिणीच्या मायेची जाणीव करून देण्यासाठी सारा फाउंडेशने ‘एक राखी वंचीत निराधार बांधवांसाठी’ हा उपक्रम हाती घेतला. त्याव्दारे शेकडाे बालकांना राख्या बाधून रक्षा बंधनचा दिवस साजरा करण्यात आला.
एक राखी वंचित निराधार भावांसाठी हा कार्यक्रम टिटवाला येथील बाल भवनमध्ये साजरा करण्यात आला. यावेळी लहान मुलांना राख्या बांधून त्यांना गाेड खाऊचे वाटप करण्यात आले. वंचित निर्धार मुलांसोबत हा रक्षाबंधन सण माेठ्या उत्साहात साजरा झाला.
अनाथ व निराधार बालकांच्या बहिणीची जागा सारा फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष संकेत वाकळे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हाध्यक्ष श्रेया कोळवनकर यांनी घेतली. यावेळी त्यांना फाऊंडेशनचे गिरीश म्हाडसे यांचे सहकार्य लाभले. रक्षाबंधन म्हणजे भावा बहिणीच्या या रक्षाबंधनचा सण निराधार व वंचीत भावांसोबत साजरा करून सारा फाऊंडेशनने बहिणीची माया, प्रेमाची जाणवी या बालकांना करून दिली आहे.