भिवंडीत मार्गावरील अपघाताने तीघांचा मृत्यु दोघांच्या बाराती ऐवजी निघाले जनाजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 05:52 PM2018-01-23T17:52:14+5:302018-01-23T17:57:00+5:30

Tigers died due to an accident on the Bhiwandi road, instead of the twelfth bati of two | भिवंडीत मार्गावरील अपघाताने तीघांचा मृत्यु दोघांच्या बाराती ऐवजी निघाले जनाजे

भिवंडीत मार्गावरील अपघाताने तीघांचा मृत्यु दोघांच्या बाराती ऐवजी निघाले जनाजे

Next
ठळक मुद्देतालुक्यातील बोरपाडा गावाजवळ मध्यरात्रीनंतर झालेल्या भिषण अपघातात तीन तरूणांचा दुर्दैवी मृत्युबंगालपूरा येथील मृत असद मिर्झा याचा २५ जानेवारी रोजी तर गुलजारनगर येथे रहाणारा सोहिद अख्तर अन्सारी याचा ३० जानेवारी रोजी शहरातच निकाह होणार होता.अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला

भिवंडी : भिवंडी-वाडा मार्गावरील बोरपाडा गावाजवळ काल मध्यरात्रीनंतर झालेल्या भिषण अपघातात तीन तरूणांचा दुर्दैवी मृत्यु झाला. या अपघातातील दोन तरूण लग्नाच्या बंधनात अडकणार होते. परंतू दोघांच्या बाराती निघण्याऐवजी त्यांचे जनाजे निघाल्याने लग्नघरांसह तीनही कुटूंबात व परिसरांत शोककळा पसरली आहे.
असद हुसेन मिर्झा (२३ रा.बंगालपुरा ),सोहिद अख्तर अन्सारी (२० रा गुलज़ार नगर), समीर फारु क अन्सारी (२०रा. औरंगाबाद)अशी तीन तरूणांची नांवे आहेत.काल रात्री औरंगाबाद येथुन आलेल्या समीर सोबत लग्नाची पार्टी करण्याच्या हेतूने ते तिघे दुचाकीवरून वाडारोड वरील हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते.मध्यरात्री नंतर ते परत येताना बोरपाडा गावाजवळील वळणावर कंटेनरने त्यांच्या दुचाकीला ठोकर दिली.त्यामुळे दोघांचा जागेवर मृत्यु झाला. तर तिसºयाला उपचारासाठी नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यु झाला.त्याचवेळी म्हापोली गावातून येणाºया शोएब मोमीन याने या घटनेची माहिती तालुका पोलीस ठाण्याला दिली. अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला असुन त्याचा पोलीस शोध घेत आहेत.
या घटनेत मृत झालेला असद मिर्झा हा शहरातील बंगालपूरा येथे रहाणारा असुन त्याचा २५ जानेवारी रोजी तर गुलजारनगर येथे रहाणारा सोहिद अख्तर अन्सारी याचा ३० जानेवारी रोजी शहरातच निकाह होणार होता. त्यासाठी त्यांच्या लग्नाची तयारी कुटूंबायांत सुरू होती.त्यातच ही दुर्दैवी घटना घडल्याने त्यांच्या कुटूंबीयांना व परिसरांतील लोकांना दोघांच्या बाराती काढण्या ऐवजी त्यांचे जनाजे काढावे लागले. त्यामुळे बंगालपूरा व गुलजारनगर परिसरांत शोककळा पसरली आहे.

Web Title: Tigers died due to an accident on the Bhiwandi road, instead of the twelfth bati of two

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.