धार्मिक कारणाच्या नावाखाली तारीकची छोटा शकीलकडे हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 06:19 AM2018-05-01T06:19:47+5:302018-05-01T06:19:47+5:30

अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिमचा हस्तक तारीक परवीन हा धार्मिक कारणास्तव पासपोर्ट मिळवायचा. त्यानंतर, तो दुबईतील त्याचा साथीदार छोटा शकील याच्याकडे हजेरी लावायचा

Till date in the name of religious reason, short shakeel must be present | धार्मिक कारणाच्या नावाखाली तारीकची छोटा शकीलकडे हजेरी

धार्मिक कारणाच्या नावाखाली तारीकची छोटा शकीलकडे हजेरी

Next

जितेंद्र कालेकर
ठाणे : अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिमचा हस्तक तारीक परवीन हा धार्मिक कारणास्तव पासपोर्ट मिळवायचा. त्यानंतर, तो दुबईतील त्याचा साथीदार छोटा शकील याच्याकडे हजेरी लावायचा. त्याच्या इशाऱ्यावरून तो मुंबईतील सूत्रे हलवत होता, असे पोलीस तपासात पुढे आले आहे.
सौदी अरेबियामध्ये वर्षभर चालणाºया ‘उमराह यात्रे’ला जाण्याच्यानावे परवीन न्यायालयातून त्याचा पासपोर्ट मिळवायचा. या यात्रेला हजेरी लावण्याबरोबरच दुबईतील त्याचा साथीदार छोटा शकील याच्याकडेही तो जायचा, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने दिली. दाऊद आणि छोटा शकीलच्या तो अनेकदा संपर्कात आला. अगदी अलीकडे २० एप्रिल २०१८ च्या दरम्यानही त्याने पारपत्र देण्याची मुंबई उच्च न्यायालयाकडे मागणी केली. तो दुबईत जाण्यापूर्वीच ठाणे पोलिसांनी त्याला अटक केली.
केबल व्यवसायाच्या स्पर्धेतून मुंब्य्रातील केबल व्यावसायिक मोहम्मद सिद्दीकी मोहम्मद उमर बांगडीवाला याचा भाऊ मोहम्मद इब्राहिम यांची २० वर्षांपूर्वी एका टोळीने हत्या केली होती. याच प्रकरणात तारीकसह सात जणांविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तारीकवगळता सर्वांची निर्दोष मुक्तताही झाली आहे. खून प्रकरणात त्याच्याविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केले जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक मारुती सावंत यांनी सांगितले.
दाऊदचा ‘मॅनेजर’
दाऊदची मुंबई महापालिका, कस्टम, नार्कोटिक्स किंवा महसूल अशा कोणत्याही विभागातील महत्त्वाची कामे ‘मॅनेज’ करण्याचे कामही परवीन करत होता. त्यामुळे
तो दाऊदचा ‘मॅनेजर’ म्हणूनही ओळखला जातो.

Web Title: Till date in the name of religious reason, short shakeel must be present

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.