रात्री दोन वाजेर्पयत निवडणुकीचे कर्तव्य बजावण-या शिक्षकांना मतदानानंतर हवीय सुटी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 05:27 PM2019-04-18T17:27:28+5:302019-04-18T17:34:30+5:30
लोकसभेच्या निवडणुकीसाठी 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्या आधीच्या दिवसापासूनच शिक्षक व शिक्षकेत्तर शालेय कर्मचा-यांना निवडणूक कामांची जबाबदार चोखपणे पार पाडावी लागते. मतदानाच्या आदल्या दिवशीच त्यांना दिलेल्या मतदान केंद्राचा ताबा घ्यावा लागतो. दिलेले साहित्या जबाबदारीने सांभाळत त्याच्या जवळच झोपावे लागते.
ठाणे : मतदानाच्या आदल्या दिवसापासून ते मतदान झाल्यानंतरही रात्री सुमारे 2 वाजेर्पयत निवडणूक कामात गुंतून राहणा-या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांना दुस-या दिवशी सुटी देण्यात यावी, अशी एकमुखी मागणी ठाणोसह पालघर, रायगड आदी कोकणातील जिल्ह्यांमधील शिक्षकांनी केली. त्यास अनुसरून ठाणोसह संबंधीत माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिका-यांना लेखी निवेदनाव्दारे साकडे घातले आहे, असे ठाणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सांगितले.
लोकसभेच्या निवडणुकीसाठी 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्या आधीच्या दिवसापासूनच शिक्षक व शिक्षकेत्तर शालेय कर्मचा-यांना निवडणूक कामांची जबाबदार चोखपणे पार पाडावी लागते. मतदानाच्या आदल्या दिवशीच त्यांना दिलेल्या मतदान केंद्राचा ताबा घ्यावा लागतो. दिलेले साहित्या जबाबदारीने सांभाळत त्याच्या जवळच झोपावे लागते. जोखमीची ही जबाबदारी संबंधीत शिक्षक, कर्मचा-यांना दुस-या दिवसाच्या मध्यरात्री म्हणजे दोन वाजेर्पयत साहित्य निवडणूक आयोगाकडे जमा होईर्पयत पार पाडावी लागते. त्यानंतर घरी येण्यास बहुतांशी शिक्षकाना 30 एप्रिलची पहाट उजाडणार आहे.यामुळे सतत दोन दिवस कामाचा ताण घेतलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांना 30 एप्रिल रोजी सुटी देणो क्रमप्राप्त होईल, याची शिक्षणाधिका-यांना निवेदनाव्दारे जाणीव करून दिल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. या सुटीसाठी शिक्षणाधिका-यां प्रमाणोच जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्याशी देखील चर्चा करणार असल्याचे त्यांनी निदर्शनात आणून दिले.
माध्यमिक व प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदींना निवडणुकीच्या सर्वात महत्वाच्या म्हणजे मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवरील कामासाठी मोठय़ाप्रमाणात घेतला आहे. ठाणे जिल्ह्यातील सहा हजार 715 मतदान केंद्रांवर सुमारे 47 हजारपेक्षा जास्त कर्मचारी निवडणूक आयोगाच्या आदेशामुळे निवडणूक यंत्रणोसाठी लागत आहे. त्यात सर्वाधिक माध्यमिक, प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठय़ाप्रमाणात जबाबदारी पार पडत आहे. मतदान केंद्रांवर दोन दिवस तणावाखाली असणा-या व रात्री उशिरार्पयत जाबाबदारी निवडण-या या शिक्षकांनी ठाणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या नेतृत्वाखाली सुटीची मागणी लावून धरली आहे. यावर प्रशासन काय निर्णय घेणार याकडे त्यांचे लक्ष लागून आहे