टिएमटीचे उत्पन्न वाढले मात्र बसेसची रस्त्यावरील संख्या घटली, खाजगी कंत्राटदाराच्या भरवशावर टिएमटीची मदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 03:56 PM2017-11-01T15:56:59+5:302017-11-01T16:00:44+5:30

ठाणे परिवहन प्रशासन सध्या खाजगी ठेकेदारावर जास्तीच मेहरबान झाल्याचे दिसत आहे. परिवहनच्या स्वत:च्या केवळ ८० च्या आसपासच बसेस रस्त्यावर धावत असून, ठेकेदाराच्या मात्र तब्बल १६२ बसेस रस्त्यावर धावत आहेत. त्यामुळे परिवहनच्या उत्पन्न वाढल्याचे दिसत असले तरी देखील त्यात ठेकेदाराच्या उत्पन्नावरच परिवहनची मदार असल्याचे दिसत आहे.

Timetee's income increased but the number of buses fell on the number of seats, thanks to the private contractor. | टिएमटीचे उत्पन्न वाढले मात्र बसेसची रस्त्यावरील संख्या घटली, खाजगी कंत्राटदाराच्या भरवशावर टिएमटीची मदार

टिएमटीचे उत्पन्न वाढले मात्र बसेसची रस्त्यावरील संख्या घटली, खाजगी कंत्राटदाराच्या भरवशावर टिएमटीची मदार

Next
ठळक मुद्देपरिवहनची मदार खाजगी ठेकेदाराच्या उत्पन्नावरपरिवहनच्या ३१७ पैकी केवळ ८० च्या आसपास बसेस रस्त्यावरखाजगीकरणाचा घाट घातल्याचा होतोय आरोप

ठाणे - एकीकडे ठाणे परिवहन सेवा सुधारण्यासाठी महापालिकेकडून विविध प्रयत्न सुरु असल्याने त्याचा फायदा देखील परिवहनला झाला आहे. परिवहनचे उत्पन् आजच्या घडीला २५ लाखांच्या वर गेले आहे. परंतु, परिवहनच्या स्वत:च्या ३१७ बसेसपैकी अवघ्या वागळे आणि कळवा आगारातून अवघ्या ८० बसेस रस्त्यावर धावत असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये दिवसाला ब्रेकडाऊनचे प्रमाण ५० च्या आसपास असल्याची माहिती देखील पुढे आली आहे. विशेष म्हणजे एकीकडे परिवहनच्या बसेस रस्त्यावर कमी झाल्या असल्यातरी देखील खाजगी ठेकेदाराच्या तब्बल १६२ रस्त्यावर धावत असल्याची माहिती परिवहनने दिली आहे. याचाच अर्थ परिवहनची मदार सध्या खाजगी ठेकेदाराच्या हाती आली असून त्याच्यावर परिवहनच्या उत्पन्नाचा गाडा हाकला जात आहे. परंतु यामुळे परिवहनचे बसेसचे प्रमाण असेच जर कमी होत राहिले तर कालांतराने परिवहनचे खाजगीकरण होण्यास वेळ लागणार नसल्याचा धक्कादायक आरोप आता होऊ लागला आहे.
शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी १९८९ च्या सुमारास ठाणे परिवहनची सुरवात केली होती. त्यावेळेस २५ बसेस होत्या. आज त्याच बसेसची संख्या ३०० हून अधिक झाली आहे. परंतु तरी देखील ठाणेकरांना या बसेस कमी पडत आहेत. एकीकडे कार्यशाळेतील अकुशल कर्मचाऱ्याच्या बाबत आक्षेप घेतला जात असतांना दुसरीकडे परिवहनच्या हक्काच्या बसेसची संख्या रस्त्यावर मात्र रोडावलेली दिसत आहे.
परिवहनच्या ताफ्यात तब्बल ३१७ बसेस आहेत. परंतु असे असतांना ही रस्त्यावर मात्र ८० बसेस धावत असल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे. त्यामुळे परिवहनच्या चालकांना बसेस नसल्याने आगारातच बसावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे. तासनतास बसून त्यांना आपला दिवस घालवावा लागत आहे. परिवहनमध्ये १९०० च्या आसपास कामगार आहेत. परंतु बसेसच रस्त्यावर तुरळक धावत असल्याने या कर्मचाºयांवर देखील भविष्यात गदा येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
परिवहनच्या ३१७ पैकी वागळे आगारातून ५५ ते ५८ च्या आसापास बसेस रस्त्यावर सध्यस्थितीत धावत आहेत. पुर्वी हीच संख्या १३० च्या आसपास होती. बसेसची संख्या रोडावल्याने त्याचा उत्पन्नावर देखील परिणाम झाला आहे. कळवा आगारात आजच्या घडीला ६० च्या आसपास बसेस आहेत. परंतु प्रत्यक्षात १८ बसेस रस्त्यावर उतरत असल्याचे वास्तव समोर आले आहे. यामुळे उत्पन्न देखील ५ ते १० लाखांनी कमी झाले आहे.
*परंतु दुसरीकडे खाजगी ठेकेदाराच्या बसेस मात्र नियमितपणे रस्त्यावर धावत असून त्यांच्या आजच्या घडीला १६२ च्या आसपास बसेस रस्त्यावर धावत आहेत. त्यांचे उत्पन्न मात्र भरघोस वाढू लागले आहे. त्यांच्याकडून मिळणाऱ्या  हिस्यावरच सध्या परिवहनची मदार आली आहे. यामुळे परिवहनला मिळणाºया उत्पन्नाचा आकडा देखील फुगला असल्याचे बोलले जात आहे.

  • परिवहनच्या कळवा आणि वागळे आगारातून रोज निघाणाऱ्या  बसेस अर्ध्यातूनच परत येत असून बसेस ब्रेकडाऊनचे प्रमाण हे ५० हून अधिक झाले आहे.
  • परिवहनच्या बसेस रस्त्यावर उतरण्याबाबतही काही आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी कळवा आगारात पुढचा टायर मागच्या बाजून लावण्याचा प्रकार घडला होता. यामुळे अपघात देखील झाला होता.

 

  • या संदर्भात परिवहन समिती सदस्य सचिन शिंदे यांनी या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी केली आहे. केवळ खाजगी ठेकेदाराची बेगमी करण्यासाठी आणि परिवहनला येत्या काळात बंद करुन खाजगीकरणाचा घाट घालण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.





 

Web Title: Timetee's income increased but the number of buses fell on the number of seats, thanks to the private contractor.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.