टिटवाळा ते कल्याण ‘पॉवर ब्लॉक’; लोकल, एक्स्प्रेस सेवेवर परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2019 04:11 AM2019-06-01T04:11:31+5:302019-06-01T04:11:48+5:30
ब्लॉकमुळे डाऊन दिशेकडील मेल, एक्स्प्रेस उशिराने धावतील. पाटलीपुत्र एक्स्प्रेस, अमृतसर एक्स्प्रेस, हटिया एक्स्प्रेस, महानगरी एक्स्प्रेस, वाराणसी एक्स्प्रेस कल्याण स्थानकावरील १ आणि १ ए स्थानकावरून चालविण्यात येणार आहेत.
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील टिटवाळा ते कल्याण दरम्यान ३१ मे आणि १ जून रोजी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
३१ मे आणि १ जून रोजी रात्री १० वाजून १६ मिनिटांची सीएसएमटी ते कल्याण, रात्री १० वाजून २४ मिनिटांची सीएसएमटी ते कल्याण, रात्री ११ वाजून ४४ मिनिटांची सीएसएमटी ते टिटवाळा, रात्री १२ वाजून ५ मिनिटांची सीएसएमटी ते अंबरनाथ लोकल रद्द करण्यात येणार आहेत.
१ जून ते २ जूनच्या रात्री ९ वाजून ४ मिनिटांची कल्याण ते सीएसएमटी, रात्री ९ वाजून २० मिनिटांची कल्याण ते सीएसएमटी, रात्री १० वाजून १ मिनिटाची अंबरनाथ ते सीएसएमटी, रात्री १० वाजून ६ मिनिटांची टिटवाळा ते सीएसएमटी लोकल रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉकमुळे डाऊन दिशेकडील मेल, एक्स्प्रेस उशिराने धावतील. पाटलीपुत्र एक्स्प्रेस, अमृतसर एक्स्प्रेस, हटिया एक्स्प्रेस, महानगरी एक्स्प्रेस, वाराणसी एक्स्प्रेस कल्याण स्थानकावरील १ आणि १ ए स्थानकावरून चालविण्यात येणार आहेत. या गाड्या ३० ते ४० मिनिटे उशिराने धावतील. ब्लॉकमुळे अप दिशेकडील मुझफ्फरपूर एक्स्प्रेस, गोरखपूर एक्स्प्रेस, कुशीनगर एक्स्प्रेस, शालिमार एक्स्प्रेस, हावडा एक्स्प्रेस, नंदिग्राम एक्स्प्रेस १५ ते ५० मिनिटे उशिराने इच्छितस्थळी पोहोचतील. अमृतसर एक्स्प्रेस दादरपर्यंत चालविण्यात येणार आहे.