टिटवाळा मॅरेथॉन : उत्तम आरोग्य जपण्यासाठी धावले ८०० स्पर्धक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 12:42 AM2020-01-17T00:42:07+5:302020-01-17T00:42:26+5:30

आठ गटांत पार पडली स्पर्धा, विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

Titwala Marathon: 3 runners up to maintain good health | टिटवाळा मॅरेथॉन : उत्तम आरोग्य जपण्यासाठी धावले ८०० स्पर्धक

टिटवाळा मॅरेथॉन : उत्तम आरोग्य जपण्यासाठी धावले ८०० स्पर्धक

googlenewsNext

टिटवाळा : स्वच्छ टिटवाळा, सुंदर टिटवाळा आणि उत्तम आरोग्य या उद्देशाने रविवारी सिद्धिविनायक युवा संस्था आणि विनायक मार्शल आर्ट्स व फिटनेस झोनतर्फे घेण्यात आलेली टिटवाळा मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली. विविध आठ गटांत झालेल्या या स्पर्धेत सुमारे ८०० स्पर्धक सहभागी झाले होते.

सिद्धिविनायक युवा संस्थानचा रविवारी अकरावा वर्धापन दिन तर, टिटवाळा मॅरेथॉनचे आठवे वर्ष होते. स्पर्धेचे उद्घाटन बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचे कमांडो दिलीपकुमार कोळी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ठाणे ग्रामीण पोलीस स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे व टिटवाळा पोलीस ठाणे, उपमहापौर उपेक्षा भोईर, नगरसेवक संतोष तरे, रोटरी क्लब आॅफ टिटवाळा आणि महागणपती हॉस्पिटलच्या डॉक्टरांची संपूर्ण टीम, साई आॅप्टिकलचे संचालक सन्नी नागदेव आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रथम विजेत्यास पारितोषिक म्हणून पाच हजारांचा धनादेश, द्वितीय पारितोषिक म्हणून तीन हजार तसेच तृतीय पारितोषिक म्हणून दोन हजारांचा धनादेश तसेच प्रत्येक पदक आणि प्रमाणपत्रही त्यांना देण्यात आले. तसेच सर्वाधिक स्पर्धकांचा सहभाग नोंदणाऱ्या शाळा व त्या क्र ीडा शिक्षकांना बेस्ट टीम ट्रॉफी देण्यात आली. शाळांमध्ये अनुक्रमे ८७ स्पर्धकांचा सहभाग नोंदवून मेरीडियन स्कूल, टिटवाळा प्रथम, ६९ स्पर्धकांचा सहभाग नोंदवून रवींद्र विद्यालय, टिटवाळा द्वितीय तर, ५० स्पर्धकांचा सहभाग नोंदवून विद्यामंदिर, मांडा-टिटवाळा ही शाळा तृतीय क्र मांकाची मानकरी ठरली.

सिद्धिविनायक संस्थेचे अध्यक्ष व राज्य युवा पुरस्कार विजेते विनायक कोळी, सचिव व क्र ीडा प्रशिक्षक हरीश वायदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली. संतोष मुंढे, गणेश गायकवाड, राजेश सिंग जितेंद्र सिंग यांनी या स्पर्धेत प्रमुख पंच म्हणून काम केले. संतोष जाधव, समाधान कोंडावळे, प्रवीण साबळे, साहिल कातडे, सचिन चांदणे, प्रशांत देशमुख यांनी मॅरेथॉन स्पर्धेचे विविध गटप्रमुख म्हणून काम पाहिले.

विविध गटांमधील विजेत्या स्पर्धकांची नावे पुढीलप्रमाणे
गट क्र मांक : १, १९ वर्षांवरील पुरु ष, अंतर : १० किमी
विजेते : विवेक विश्वकर्मा (प्रथम), संदेश बांगर (द्वितीय), योगेश आखाडे (तृतीय)
गट क्र मांक २, १९ वर्षांवरील महिला, अंतर : ७ किमी
विजेते : मनीषा लोखंडे (प्रथम), सविता सुळे (द्वितीय), पूजा कोंडावळे (तृतीय)
गट क्र मांक ३, १६ ते १९ वयोगटांतील मुले, अंतर : ५ किमी
विजेते : प्रसाद गुडेकर (प्रथम), विशाल कडाळी (द्वितीय), जगदीश शिंदे (तृतीय)
गट क्र मांक ४, १६ ते १९ वयोगटांतील मुली, अंतर : ४ किमी,
विजेते : प्रियंका धायगुडे (प्रथम), हर्षदा पाडेकर (द्वितीय), आशा गोडे (तृतीय)
गट क्र मांक ५, १३ ते १५ वयोगटांतील मुले, अंतर : ३ किमी
विजेते : संदीप गुप्ता (प्रथम), अफजल शेख (द्वितीय), शिवशंकर पाल (तृतीय)
गट क्र मांक ६, १३ ते १५ वयोगटांतील मुली, अंतर :२ किमी
विजेते : भूमिका तरे (प्रथम), श्वेता मौर्या (द्वितीय), दीपाली गोडे (तृतीय क्र मांक),
गट क्र मांक ७, ९ ते १२ वयोगटांतील मुले, अंतर : १.५ किमी
विशाल यादव (प्रथम), आशीष सिंग (द्वितीय), रोहित हरजिन (तृतीय)
गट क्र मांक ८, ९ ते १२ वयोगटांतील मुली, अंतर : १ किमी ध्यानी मावनी (प्रथम), ईश्वरी दातखिळे (द्वितीय), रीना वळवी (तृतीय)

Web Title: Titwala Marathon: 3 runners up to maintain good health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.