विनाकारण अॅडमिट करून घेणाऱ्या खासगी रुग्णालयांना ठामपाचा दणका, ठोठावला लाखोंचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2020 06:17 PM2020-06-07T18:17:23+5:302020-06-07T18:18:17+5:30

कोणताही आजार नसताना ठाण्यातील या दोन हाॅस्पिटलनी १३ ठाणेकरांना दाखल करुन घेतले होते आणि त्यांच्यावर ७ दिवस उपचार करुन त्यांच्याकडून लाखोंची बीले आकारली होती.

TMC action on Private hospitals, who admitted patient without any reason | विनाकारण अॅडमिट करून घेणाऱ्या खासगी रुग्णालयांना ठामपाचा दणका, ठोठावला लाखोंचा दंड

विनाकारण अॅडमिट करून घेणाऱ्या खासगी रुग्णालयांना ठामपाचा दणका, ठोठावला लाखोंचा दंड

googlenewsNext

ठाणे - विनाकारण भीती दाखवून हाॅस्पिटलमध्ये एडमिट करुन घेतले आणि अव्वाच्या सव्वा बील आकारले म्हणुन ठाणे महानगर पालिकेने ठाण्यातील दोन खाजगी हाॅस्पिटलसेवा दंड आकारला आहे. तब्बल १६ लाख रुपये दंड पालिकेकडून आकारण्यात आला आहे. राज्यातील ही पहिलीच कारवाई असून, गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांच्या हाॅस्पिटल विरोधात तक्रारी येत होत्या, त्याची शाहनिशा करून ठाणे महानगरपालिकेने ही कारवाई केली आहे. कोणताही आजार नसताना ठाण्यातील दोन हाॅस्पिटलनी १३ ठाणेकरांना दाखल करुन घेतले होते आणि त्यांच्यावर ७ दिवस उपचार करुन त्यांच्याकडून लाखोंची बीले आकारली होती. याबाबत ठाणे महानगर पालिकेकडे तक्रारार आल्यावर ठाणे महानगर पालिकेने चौकाशी करुन या दोन हाॅस्पिटल वर कारवाई केली आहे.  

अशा प्रकारे नागरिकांची पिळवणूक करणे आणि त्या हाॅस्पिटलवर कारवाई होणे ही राज्यातील पहिलीच वेळ असून, यामुळे आता विनाकारण उपचार करणा-या हाॅस्पिटलना चपराक बसेल. ठाण्यात या आघी देखील अशा तक्रारी आल्या होत्या तसेच थायरो केअर नावाच्या एका लॅबला ठाणे महानगर पालिकेने सॅब टेस्ट न करण्याची नोटीस धाडली आहे. काही लॅबने स्वॅब टेस्ट केल्या होत्या. मात्र त्यांचे अहवाल हे चुकीचे आल्याने नागरिकांना मनस्ताप झाला होता. ठाणे महानगरपालिकादेखील अशा हाॅस्पिटल आणि लॅबवर कारवाई करणारी राज्यातील पहिली महानगरपालिका ठरली आहे.

Web Title: TMC action on Private hospitals, who admitted patient without any reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.