दहा हजारांची लाच स्वीकारणारा ठामपाचा लिपिक जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 12:35 AM2020-12-04T00:35:21+5:302020-12-04T00:38:09+5:30
बारबालांना घर भाडयाने घेऊन दिले म्हणून इस्टेट एजंटकडून दहा हजारांची लाच उकळणाऱ्या ठाणे महापालिकेच्या लिपीकाला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी रंगेहाथ अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : एका रियल इस्टेट दलालाकडून 10 हजारांची लाच स्वीकारणार्या ठाणे महापालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागातील हेमंत गायकवाड (33) या लिपिकाला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरु वारी रंगेहाथ अटक केली. बारमध्ये काम करणार्या मुलींना भाड्याने घर घेऊन दिले म्हणून कारवाई न करण्यासाठी त्याने या दलालाकडे लाचेची मागणी केली होती.
स्थावर मालमत्तांच्या खरेदी-विक्र ी तसेच भाडेकरारांच्या व्यवहारांचे काम करणार्या तक्र ारदार दलालाने बारमध्ये काम करणार्या मुलींना ठाण्यातील चितळसर मानपाडा येथील दोस्ती इंपेरियर येथे भाड्याने रूम घेऊन दिली होती. या मुलींना ती दिल्यामुळे लिपिक गायकवाड यांनी ब्रोकरवर कारवाईचा इशारा दिला होता. ही कारवाई न करण्यासाठी त्याच्याकडे 10 हजार रु पये मागितले होते. याबाबतची तक्र ार या दलालाने थेट ठाणे एसीबीकडे केली होती. या तक्र ारीची एसीबीच्या पथकाने गुरु वारी पडताळणी केली. तेंव्हा त्याने लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर एसीबीने सापळा रचून त्याला 10 हजारांची लाच स्वीकारताना ठाण्यातील कोर्टनाका परिसरातून अटक केली. या प्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरु द्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास एसीबीचे पोलीस उपअधीक्षक मदन बल्लाळ हे करीत आहेत.