विसजर्नासाठी येणाऱ्या भाविकांची होणार अॅन्टीजन चाचणी; महापालिका आयुक्त शर्मा यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 05:15 PM2021-08-27T17:15:54+5:302021-08-27T17:17:56+5:30

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गणोशोत्सव काळात विसजर्नाच्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची अँटिजन चाचणी केली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिली आहे.

tmc municipal commissioner says devotees coming for visjarna will undergo antigen testing | विसजर्नासाठी येणाऱ्या भाविकांची होणार अॅन्टीजन चाचणी; महापालिका आयुक्त शर्मा यांची माहिती

विसजर्नासाठी येणाऱ्या भाविकांची होणार अॅन्टीजन चाचणी; महापालिका आयुक्त शर्मा यांची माहिती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे  : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गणोशोत्सव काळात विसजर्नाच्या ठिकाणी येणाऱ्या  भाविकांची अँटिजन चाचणी केली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिली आहे. महानगरपालिकेच्यावतीने प्रत्येक विसर्जन ठिकाणी अँन्टीजन चाचणी केंद्र उभारण्यात येणार असून या ठिकाणी भाविकांची अँन्टीजन चाचणी करण्यात येणार आहे. यासाठी जवळपास ५० हजार अँन्टीजन किट तयार ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महापालिका भवन येथे सार्वजनिक गणोशोत्सवच्या अनुषंगाने करण्यात येणा:या विविध कामांचा महापालिका आयुक्त शर्मा यांनी गुरुवारी आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उप आयुक्त अशोक बुरपल्ले, नगर अभियंता अजरुन अहिरे तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कोरोनाचा संसर्ग होवू नये यासाठी विसर्जनाच्यावेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी ठाणो महापालिकेच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

विसर्जन घाट

श्री गणोश मुर्तींचे विधिवत वाहत्या पाण्यात विसर्जन व्हावे यादृष्टीकोनातून महापालिकेच्यावतीने पारिसक रेतीबंदर, कोलशेत, कोपरी(चेंदणी कोळीवाडा) कळवा पूल(निसर्ग उद्यान), कळवा(ठाणे  बाजू), बाळकूम घाट आण िदिवा घाट असे एकूण ७ विसर्जन घाट तयार करण्यात आले आहेत. या ठिकाणी छोटया गणोश मुर्तींबरोबर मोठया आकाराच्या गणोश मुर्तींचे विसर्जन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महापालिकेच्यावतीने निर्माल्य कलश या व्यवस्थेबरोबरच नागरिकांना श्री गणोश विसर्जन सोहळा पाहता यावा यासाठी विशेष व्यवस्था, गणोश भक्तांच्या वाहनांसाठी वाहन तळ, पाणबुडी पथक, अिग्नशमन दल, प्रखर विद्युत व्यवस्था, वैद्यकीय पथक आण िप्रसाधनगृह अशी यंत्नणा सज्ज ठेवण्यात येणार आहे.

भाविकांची अँन्टीजन चाचणी

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विसर्जनासाठी येणा:या भाविकांची अँन्टीजन चाचणी करणो महत्त्वाचे आहे. ठाणो महानगरपालिकेच्यावतीने प्रत्येक विसर्जन ठिकाणी अँन्टीजन चाचणी केंद्र उभारण्यात येणार असून या ठिकाणी भाविकांची अँन्टीजन चाचणी करण्यात येणार आहे. यासाठी जवळपास ५० हजार अँन्टीजन किट तयार ठेवण्यात येणार आहेत.

कृत्रीम तलावांची निर्मिती

श्री गणोश मुर्तींच्या विसर्जनामुळे शहरातील तलावांचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने मासुंदा तलाव, खारेगाव तलाव, न्यू शिवाजी नगर, ऋतू पार्क, खिडकाळी तलाव, दातीवली तलाव, वागळे इस्टेट परिसरातील रायलादेवी तलाव नं.१, रायलादेवी तलाव नं.२, उपवन येथे पालायदेवी मंदिर, आंबेघोसाळे तलाव, निळकंठ वुडस् उपवन तलाव, बाळकुम रेवाळे आणि कावेसर (हिरानंदानी) या ठिकाणी कृत्रीम तलाव निर्माण करण्यात आले आहेत. या कृत्रीम तलावाच्या ठिकाणी निर्माल्य कलश, वैद्यकीय पथक, अग्निशमन दल, प्रखर विद्युत व्यवस्था आणि ध्वनीक्षेपण यंत्रणा आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
 
श्री गणेश मुर्ती स्वीकृती केंद्रे

महापालिकेने मासुंदा तलाव, मढवी हाऊस, वर्तकनगरमध्ये देवदया नगर ,शिवाई नगर, चिरंजीवी हॉस्पीटल,महागिरी कोळीवाडा, कोपरी प्रभाग समतिी कार्यालय, किसननगर  बस स्टॉप, मॉडेला चेक नाका, टेंभी नाका, काशिनाथ घाणोकर नाट्यगृह, पवार बस स्टॉप, वसंत विहार शाळा, कामगार हॉस्पिटल, लोकमान्य नगर बस स्टॉप यशोधन नगर, रजिन्सी हाईट्स, ट्रॉपिकल लगून समोर आनंदनगर, विजयनगरी अँनेक्सा कासारवडवली, लोढा लक्ङोरिया, जेल तलाव, सह्याद्री शाळा मनीषा नगर, आणि दत्त मंदिर, शिळ प्रभाग कार्यालय आदी ठिकाणी श्री गणोश मुर्ती स्वीकार केंद्रे उभी करण्यात येणार आहेत. या सर्व ठिकाणी  निर्माल्य कलश, ध्वनीक्षेपण यंत्नणा आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या केंद्रांवर प्राप्त  होणा-या सर्व गणोश मुर्तींचे महापालिकेमार्फत विधिवत विसर्जन करण्याची व्यवस्था करण्यात आली असून त्यासाठी विशेष वाहन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणो डिजी ठाणो प्रणालीद्वारे देखील विसर्जनासाठी ऑनलाईन टाईम स्लॉट बुकिंग योजनाही राबविण्यात येणार आहे.
 

Web Title: tmc municipal commissioner says devotees coming for visjarna will undergo antigen testing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.