टीएमसी पालिकेच्या लेखा परीक्षा विभागाकडून कोविड रुग्णालयांची झाडाझडती 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 02:23 PM2020-07-18T14:23:54+5:302020-07-18T14:24:45+5:30

या सर्व रुग्णालयांना महापालिकेने नोटीस देण्याची कार्यवाही सुरू केली आहे.

TMC's municipal audit department clears Kovid hospitals | टीएमसी पालिकेच्या लेखा परीक्षा विभागाकडून कोविड रुग्णालयांची झाडाझडती 

टीएमसी पालिकेच्या लेखा परीक्षा विभागाकडून कोविड रुग्णालयांची झाडाझडती 

Next

ठाणे : ठाणे महापालिकेने घोषित केलेल्या खासगी कोविड रुगणालय व्यवस्थापनाने कोरोनाबाधित रुग्णांकडून जादा बिल आकारल्याचे सिद्ध झाल्यास सदरची वाढीव रक्कम तात्काळ रुग्णांच्या खात्यात परत करण्यातचे आदेश महापालिका आयुक्त डॅा. विपीन शर्मा यांनी दिले असून, त्यासाठी मुख्य लेखा परीक्षकांच्या अधिपत्त्याखालील विशेष पथकाने शहरातील 15 कोवीड रूग्णालयांची तपासणी करून जवळपास 27 लाख रुपयांची 196 अक्षेपित देयकांची नोंद केली आहे. या सर्व रुग्णालयांना महापालिकेने नोटीस देण्याची कार्यवाही सुरू केली आहे.

महापालिकेने खासगी कोविड रुग्णालयाने त्यांच्याकडे दाखल झालेल्या कोरोनाबाधित रुग्णांकडून किती देयक आकारावे याच दर यापूर्वीच निश्चित केले असून, त्यानुसार रुग्णालये आकारणी करतात किंवा नाही याची तपासणी करण्यासाठी महापालिकेचे मुख्य लेखा परीक्षक किरण तायडे यांच्या अधिपत्याखाली विशेष पथक नेमण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला होता. त्यानुसार या पथकाने महापालिका हद्दीमधील जवळपास 15 खासगी कोविड रुग्णालयांची तपासणी केली. त्यांनी कशा प्रकारे रुग्णांना देयक आकारले आहे, याची तपशीलवार माहिती घेतली. या पथकाकडे 15 कोवीड रूग्णालयांमधून आतापर्यंत एकूण 1752 देयके प्राप्त झाली आहेत. त्यापैकी 486 देयकांची या पथकाने तपासणी करून एकूण 196 अक्षेपित देयकांची नोंद केली आहे. या एकूण 196 अक्षेपित देयकांची रक्कम ही 27 लाखांपेक्षा जास्त आहे.

या सर्व अक्षेपित देयकांबाबत संबंधित रुग्णालयांकडून तात्काळ खुलास मागविण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिले आहेत. संबंधित रुग्णालयांकडून खुलासा प्राप्त झाल्यानंतर त्याची शहानिशा करून ज्या रुग्णालयाने एखाद्या रुग्णांकडून वाढीव रक्कम वसूल केल्याचे सिद्ध झाल्यास ती जादा आकारण्यात आलेली रक्कम संबंधित रुग्णाच्या खात्यावर परत करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार या सर्व रुग्णालयांना नोटीस बजाविण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

Web Title: TMC's municipal audit department clears Kovid hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.