टीएमटी कर्मचा-यांचा प्रश्न : ४० कोटी रुपयांची देणी थकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 01:35 AM2018-02-28T01:35:26+5:302018-02-28T01:35:26+5:30

ठाणे परिवहन सेवेचे अंदाजपत्रक नुकतेच सादर झाले असून यामध्ये परिवहनच्या कामगारांची महागाई भत्ता, सार्वजनिक सुट्या, वैद्यकीय भत्ता आणि सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या थकबाकीपोटीची आजही ४० कोटींची देणी देणे शिल्लक असल्याचे उघड झाले आहे. जुलै २०१३ पासूनची ती असल्याचेही यातून स्पष्ट झाले आहे.

 TMT employee's question: 40 crores of tax exhausted | टीएमटी कर्मचा-यांचा प्रश्न : ४० कोटी रुपयांची देणी थकली

टीएमटी कर्मचा-यांचा प्रश्न : ४० कोटी रुपयांची देणी थकली

Next

ठाणे : ठाणे परिवहन सेवेचे अंदाजपत्रक नुकतेच सादर झाले असून यामध्ये परिवहनच्या कामगारांची महागाई भत्ता, सार्वजनिक सुट्या, वैद्यकीय भत्ता आणि सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या थकबाकीपोटीची आजही ४० कोटींची देणी देणे शिल्लक असल्याचे उघड झाले आहे. जुलै २०१३ पासूनची ती असल्याचेही यातून स्पष्ट झाले आहे.
परिवहनच्या अर्थात टीएमटीच्या ताफ्यात आजघडीला ३१३ बस असल्या तरी प्रत्यक्षात रस्त्यावर १८० च्या आसपास धावत आहेत. परिवहनचे प्रवासी एक लाखांनी कमी झाले असून रोज सुमारे दीड लाख प्रवासी प्रवास करीत आहेत. मात्र, रोजचे उत्पन्न हे पूर्वीपेक्षा अधिक झाले आहे. यापूर्वी परिवहनला १८ ते २० लाख रुपये मिळत होते. यंदा मात्र, ते २८ ते ३० लाखांच्या घरात गेले आहे. उत्पन्न वाढत गेल्याने आता परिवहन सेवेने कर्मचाºयांची थकबाकी देण्यास सुरुवात केली आहे. पूर्वी ८० कोटींच्या घरात असलेली थकबाकीची रक्कम आजघडीला ४० कोटींपर्यंत खाली आल्याची माहिती अंदाजपत्रकातून समोर आली आहे. परंतु, उत्पन्नापेक्षा खर्च हा अधिक असल्याने परिवहनपुढे थकबाकीचा डोंगर आजही उभा आहे. यातीलच एक महत्त्वाची बाब म्हणजे आजही परिवहन कर्मचाºयांना पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगातील फरकाची रक्कम मिळालेली नाही. सहाव्या वेतन आयोगातील फरकाच्या महागाई भत्त्याची २१ कोटी ८९ लाख ९२ हजार ४५५ रुपयांची रक्कम देणे आजही प्रलंबित आहे. या रकमेतील २१ कोटी ८० लाख रुपये हे पालिकेकडे अनुदानरुपी मागण्यात आले आहेत. तसेच सार्वजनिक सुट्यापोटी, यामध्ये भाऊबीज, पाडवा, रक्षाबंधन, कामगार दिन, गणपती आदींसह इतर सुट्यांचे ५ कोटी १६ लाख, वैद्यकीय भत्यापोटी १ कोटी ६० लाख ८० हजार, रजा प्रवास भत्ता ६ कोटी ६६ लाख ५० हजार ८५०, पुरक पोत्साहन भत्ता ४१ लाख ५१ हजार ३५० आणि सेवानिवृत्त कर्मचाºयांची ४ कोटी २० लाखांची अशी एकूण मिळून सुमारे ४० कोटींची देणी शिल्लक असल्याचे समोर आले आहे.

Web Title:  TMT employee's question: 40 crores of tax exhausted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे