टीएमटीच्या 13 व्होल्वो बस पडून : परिवहनला १ कोटी १० लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 06:16 AM2017-08-09T06:16:05+5:302017-08-09T06:16:05+5:30

ठाणे परिवहनच्या साध्या बसेस किरकोळ कामांसाठी धूळखात पडल्याच्या अनेक घटना समोर येत असतांनाच आता परिवहनला सोन्याची अंडी देणारी अशी ओळख असलेल्या १३ व्होल्वो बस मागील महिनाभरापासून काही किरकोळ कारणांसाठी मुल्लाबाग येथील आगारात धूळखात पडून असल्याची गंभीरबाब परिवहन समितीच्या बैठकीत उघड झाली.

TMT's 13 volvo buses: loss of transportation of Rs.1 crore 10 lakhs | टीएमटीच्या 13 व्होल्वो बस पडून : परिवहनला १ कोटी १० लाखांचे नुकसान

टीएमटीच्या 13 व्होल्वो बस पडून : परिवहनला १ कोटी १० लाखांचे नुकसान

Next

 ठाणे : ठाणे परिवहनच्या साध्या बसेस किरकोळ कामांसाठी धूळखात पडल्याच्या अनेक घटना समोर येत असतांनाच आता परिवहनला सोन्याची अंडी देणारी अशी ओळख असलेल्या १३ व्होल्वो बस मागील महिनाभरापासून काही किरकोळ कारणांसाठी मुल्लाबाग येथील आगारात धूळखात पडून असल्याची गंभीरबाब परिवहन समितीच्या बैठकीत उघड झाली. सत्ताधारी शिवसेनेचे सदस्य प्रकाश पायरे यांनी ही बाब उघडकीस आणली असून यामुळे परिवहनला महिनाभरात तब्बल १ कोटी १० लाखांचे नुकसान झाल्याचेही त्यांनी सांगितले.
ठाणे परिवहनमार्फत शहरातील विविध मार्गांवर बस चालविण्यात येत आहेत. तसेच नव्या एसीबस दाखल झाल्यानंतर त्या शहराबाहेरील मार्गावरदेखील धावण्यास सुरुवात झाली आहे. प्रवाशांना हेरण्यासाठी परिवहनेने या मार्गांवर ३० व्होल्वो बस सुरु केल्या. यामाध्यमातून चांगली प्रवासी सुविधा पुरविण्यात येते. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून या बसमधून प्रवास करणाºया प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून त्याचा फायदा टीएमटीला होऊ लागला आहे. असे असतानाच मागील महिनाभरापासून ३० पैकी १३ व्होल्वो बस नादुरु स्त असल्याची बाब मंगळवारी झालेल्या परिवहनच्या बैठकीत उघड झाली.
शिवसेनेचे परिवहन सदस्य प्रकाश पायरे यांनी या १३ व्होल्वो बसेस नादुरु स्त असल्याचा मुद्दा उपस्थित करून परिवहन प्रशासनावर टीकेचा भडीमार केला. १३ पैकी ९ बसेसच्या डिझेल टाकीमध्ये पाणी गेल्यामुळे इंजेक्ट खराब झाले आहे तर उर्वरित तीन बस काचेच्या दुरु स्तीसाठी आगारात धूळखात उभ्या आहेत. ३ जुलै पासून त्या मुल्लाबाग आगारात उभ्या असल्यामुळे टीएमटीला दररोज एका बसमागे २५ हजार रु पयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागत आहे. तसेच एकूण १३ नादुरु स्त बसेसमुळे दिवसाचे सव्वा तीन लाखांच्या उत्पन्न बुÞडत असून त्यामुळे महिनाभरात एक कोटी १० लाखांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागल्याची भितीदेखील त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, या बस तातडीने दुरु स्त करून रस्त्यावर उतरविण्याचे आदेश यापूर्वीच संबंधित विभागांना दिले असून त्याच्या दुरु स्तीची कामे तत्काळ करण्यात येतील, असे परिवहनचे प्रभारी व्यवस्थापक संदीप माळवी यांनी सांगितले. वागळे आणि कळवा आगारामध्ये अन्य बसच्या दुरु स्तीसाठी एका बसचे स्पेअरपार्ट काढून दुसºया बसला वापरले जायचे. त्यामुळे ज्या बसचे स्पेअर पार्ट काढले ती चांगली गाडी भंगार व्हायची आणि त्यामुळे बसेच्या संख्येतही घट व्हायची. त्याचप्रमाणे मुल्लाबाग आणि आनंदनगर डेपोमध्येही असाच काहीसा प्रकार सुरु आहे. त्यामुळे या दोन्ही आगारात वागळे आणि कळवा आगाराची पुनरावृत्ती नको, अशी मागणी शिवसेनेचे राजेंद्र महाडीक यांनी केली.

कळवा आगाराची झाली दैना

कळवा आगाराच्या दैनाव्यवस्थेचा पाढा मंगळवारी झालेल्या परिवहन समितीच्या बैठकीत विरोधकांनी वाचला. गळके छप्पर, धोकादायक झालेल्या भिंती, भंगार, टायर, कर्मचाºयांना मागील पाच वर्षांपासून नव्या कपड्यांची वाणवा, यासह इतर असुविधांचा पाढाच यावेळी विरोधकांनी वाचला. त्यानंतर आता या डेपोची पाहणी करून आवश्यक ते उपाय करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले. वागळे आणि कळवा हे परिवहनचे महत्त्वाचे दोन डेपो आहेत. परंतु, या दोन्ही डेपोंची अवस्था फारशी काही चांगली नाही.

परिवहन समिती सदस्य तकी चेऊलकर यांनी सोमवारी रात्री कळवा आगाराची पाहणी केली असता त्यांना दुरवस्थेचे दर्शन झाले. त्यानुसार मंगळवारी त्यांनी याचा पाढाच परिवहनच्या बैठकीत वाचला. आगाराच्या चारही भिंती धोकादायक झाल्याचे सांगतानाच, शौचालयांची दैना, गळके छत, आगारात साचलेल्या पाण्यामुळे मच्छरांची वाढती पैदास यामुळे येथील कर्मचाºयांचे आरोग्यही धोक्यात येत असल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला. यावर नवनिर्वाचीत सभापती अनिल भोर यांनी आगाराची पाहणी करून त्यावर तत्काळ उपाय करण्याचे आश्वासन दिले.

Web Title: TMT's 13 volvo buses: loss of transportation of Rs.1 crore 10 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.