TMT च्या एसी बसचे तिकीट दर निम्मे; प्रादेशिक परिवहन विभागाने दिली मंजुरी
By अजित मांडके | Published: April 21, 2023 09:17 PM2023-04-21T21:17:31+5:302023-04-21T21:17:52+5:30
टीएमटीच्या एसी बसचे कमीत कमी तिकीट २० रुपये तर जास्तीत जास्त तिकीट १०५ रुपये इतके होते.
ठाणे - ठाणे परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या आहेत. इलेक्ट्रिक तसेच इतर एसी बसचे तिकीट दर कमी करण्यासंबंधी परिवहन समितीने दिलेल्या प्रस्तावास प्रादेशिक परिवहन विभागाने मंजुरी दिली आहे. यामुळे शनिवारपासून वातानुकूलीत बसचे तिकीट दर निम्मे होणार असल्याने त्याचा फायदा प्रवाशांना होणार आहे.
टीएमटीच्या एसी बसचे कमीत कमी तिकीट २० रुपये तर जास्तीत जास्त तिकीट १०५ रुपये इतके होते. त्यात कपात करून कमी तिकीट दर १० रुपये तर, जास्तीत जास्त तिकीट ६५ रुपये इतके करण्याचा निर्णय परिवहन समितीने घेतला होता. यासंबंधीचा प्रस्ताव समितीने तयार केला होता. त्यास प्रादेशिक परिवहन विभागाने मंजुरी दिली आहे. हे दर आज, शनिवारपासून लागू होणार आहेत. बसचे तिकीट दर निम्याने कमी केल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
या निर्णयानुसार वातानुकूलीत बसचे कमीत कमी तिकीट दर १० रुपये तर, जास्तीत जास्त तिकीट ६५ रुपये इतके करण्यात आले आहे. यापुर्वी कमीत कमी तिकीट २० रुपये तर जास्तीत जास्त तिकीट १०५ रुपये इतके होते. बसचे तिकीट दर निम्याने कमी केल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
असे असतील तिकीट दर
किलोमीटर - पुर्वीचे दर - सुधारीत दर
०-२ - २० - १०
२-४ - २५ - १२
४-६ - ३० - १५
६-८ - ३५ - १८
८-१० - ४० - २०
१०-१४ - ५० - २५
१४-१६ - ५५ - २५
१६-२० - ६५ - ३०
२०-२२ - ७५ - ३५