टीएमटीचा ठावठिकाणा अ‍ॅपच्या एका क्लिकवर

By admin | Published: March 15, 2017 02:30 AM2017-03-15T02:30:31+5:302017-03-15T02:30:31+5:30

प्रवाशांना परिवहन बसेसची सेवा अधिक सुलभपणे देता यावी यासाठी ठाणे परिवहनसेवेने प्रवाशांसाठी ‘व्हेअर इज माय बस’ हे अ‍ॅप उपलब्ध करु न दिले आहे.

TMT's whereabouts, in one click of the app | टीएमटीचा ठावठिकाणा अ‍ॅपच्या एका क्लिकवर

टीएमटीचा ठावठिकाणा अ‍ॅपच्या एका क्लिकवर

Next

ठाणे : प्रवाशांना परिवहन बसेसची सेवा अधिक सुलभपणे देता यावी यासाठी ठाणे परिवहनसेवेने प्रवाशांसाठी ‘व्हेअर इज माय बस’ हे अ‍ॅप उपलब्ध करु न दिले आहे. या अ‍ॅपचे उद्घाटन मंगळवारी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते झाले.
यावेळी आमदार संजय केळकर, रविंद्र फाटक, जितेंद्र आव्हाड, आयुक्त संजीव जयस्वाल, नगरसेवक संजय वाघुले, मनोहर डुंबरे, योगेश जानकर, सुधीर कोकाटे, भरत चव्हाण, नरेश मणेरा, मुकूंद केणी, गुरूमुख सिंग, दिपक वेतकर, शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के, अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, अशोककुमार रणखांब, व्यवस्थापक सुधीर राऊत उपस्थित होते.
मुंबईतील केपीएमजी अ‍ॅडव्हायजरी सर्व्हिसेस प्रा.लि कंपनीने हे अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून प्रवाशांना परिवहन सेवेची बस किती वेळात बसथांब्यावर अपेक्षित आहे, तसेच बस कोणत्या मार्गावरु न धावणार आहे, तिकिटाची किमंत, बसमध्ये उपलब्ध असलेल्या सीटस्ची संख्या आदी सर्व माहिती एकाच वेळी उपलब्ध होणार आहे. प्रवासी ज्या बसथांब्यावर उभे असतील तेथे बस किती वेळात पोहचेल याचीही माहिती या अ‍ॅपच्या माध्यमातून मिळणार आहे. तसेच बसचे तिकिट, पासदेखील आॅनलाईन उपलब्ध होणार आहे. ठाणे परिवहनच्या नीळकंठ येथील आगारामध्ये या आॅनलाईन सेवेचे कंट्रोल असणार आहे. प्रवाशांनी ६ँी१ी्र२े८ु४२ हे अ‍ॅप आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करुन घेतल्यास ठाणे शहरातील परिवहनच्या सर्व बसेसची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: TMT's whereabouts, in one click of the app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.