एक बाप म्हणून हे सगळं सहन करायचं?; नताशाचे वडील जितेंद्र आव्हाड झाले भावूक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 08:14 PM2023-02-16T20:14:11+5:302023-02-16T20:14:29+5:30

राजकारण बाजूला ठेवा पण, कधीतरी ह्या गोष्टीचा देखील विचार करा असं भावनिक आवाहन जितेंद्र आव्हाडांनी केले आहे. 

To bear all this as a father?; Natasha's father NCP leader Jitendra Awhad became emotional | एक बाप म्हणून हे सगळं सहन करायचं?; नताशाचे वडील जितेंद्र आव्हाड झाले भावूक

एक बाप म्हणून हे सगळं सहन करायचं?; नताशाचे वडील जितेंद्र आव्हाड झाले भावूक

googlenewsNext

ठाणे - राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचं उघड झाल्यानंतर आता ठाण्यात राजकीय वातावरण पेटलं आहे. आव्हाड समर्थकांनी ठाणे महापालिकेतील सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण केली. त्यानंतर आता दोन्ही बाजूने एकमेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचवेळी जितेंद्र आव्हाड भावूक झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

जितेंद्र आव्हाड म्हणतात की, ज्या नताशाला मी तिच्या जन्मानंतर साधं बोटही कधी लावलं नाही किंवा ओरडलोही नाही. तिच्याबद्दल एक व्यक्ती फिल्डींग लावून मारुन टाकेन हे बोलतो. तेव्हा प्रचंड राग येतो. अस्वस्थता येते. तुम्हीच मला सांगा एक राजकीय नेता म्हणून हे सगळं सहन करायचं? एक पिता म्हणून हे सगळं सहन करायचं? आणि भूमिका काय घ्यायची ? घाबरुन घरी बसायचं की उघडपणाने मैदानात यायचं असा सवाल त्यांनी विचारला आहे. 

त्याचसोबत कोण आहे बाबाजी? बाबाजी म्हणजे दाऊद इब्राहीमचा हस्तक. जे जे हत्या शुटआऊट मधील पहिल्या पाच जणांमधील एक आरोपी. स्वत:चं मुंबईमध्ये प्रचंड नाव असलेला. त्याच्या हस्तकांकरवी जावयाचा आणि मुलीचा मर्डर होणार हे ऐकल्यानंतर एका बापाला काय वाटलं असेल. राजकारण बाजूला ठेवा पण, कधीतरी ह्या गोष्टीचा देखील विचार करा असं भावनिक आवाहन जितेंद्र आव्हाडांनी केले आहे. 

काय आहे प्रकरण?
जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबाला संपवण्यासाठी तिहार जेलमध्ये असलेला गँगस्टर बाबाजी उर्फ सुभाषसिंग ठाकूर याच्या मदतीने शूटर तैनात केले असल्याची कबुली देणारी ठामपातील अधिकारी महेश आहेर यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लीपमुळे ठाण्यात खळबळ माजली आहे. ठाणे पालिकेतील प्रभारी सहाय्यक आयुक्त महेश आहेर आणि अन्य दोघांमधील हे संभाषण व्हायरल झाले. या संभाषणात महेश आहेर यांनी जितेंद्र आव्हाड यांचा उल्लेख साप असा केला असून त्यांना ठेचण्याची भाषाही आहेर यांनी केली आहे. या कथित ऑडिओ क्लीपची पुष्टी लोकमत करत नाही.   
 

Web Title: To bear all this as a father?; Natasha's father NCP leader Jitendra Awhad became emotional

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.