युट्युबवरील लाईकचे टास्क पूर्ण करण्यासाठी तरुणाला मोजावे लागले 26 लाख
By पंकज पाटील | Published: May 11, 2023 04:41 PM2023-05-11T16:41:04+5:302023-05-11T16:41:26+5:30
बदलापुरात राहणारे विकासकुमार कांबळे यांची देखील अशीच फसवणूक 5 मार्च 2023 रोजी झाली.
बदलापूर: बदलापूरमध्ये एका व्यक्तीला युट्युबचे लाईक व्हिडिओ टास्क पूर्ण करून देण्याचे आमिष दाखवीत तब्बल 25 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक केलीये. याप्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यात बदलापूरमध्ये ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार सातत्याने वाढत आहेत. ऑनलाइन फसवणुकीसाठी जी युक्ती वापरण्यात येत आहे त्यामध्ये प्रत्येक वेळेस नावीन्यता असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक केव्हा आणि कशी होईल याचा नेम राहिलेला नाही.
बदलापुरात राहणारे विकासकुमार कांबळे यांची देखील अशीच फसवणूक 5 मार्च 2023 रोजी झाली. युट्युबवरचे लाईक व्हिडिओ टास्क पूर्ण करण्यासाठी ही फसवणूक करण्यात आली आहे. या फसवणुकीच्या माध्यमातून तब्बल 25 लाख 80 हजार रुपये परस्पर लाटण्यात आले आहेत. आतापर्यंतच्या झालेल्या ऑनलाईन फसवणुकीमध्ये हा सर्वात वेगळा आणि नवीन मार्ग फसवणूक करण्यानी स्वीकारलाय. याप्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात फसवणूक करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.