ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीणमधील अंमली पदार्थांचा वापर रोखण्यासाठी परदेशी कुरिअर बंद, कंपन्यांवर लक्ष !

By सुरेश लोखंडे | Published: February 28, 2023 08:10 PM2023-02-28T20:10:35+5:302023-02-28T20:10:44+5:30

जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक देशमाने यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृष्यप्रणालीद्वारे पार पडली.

To prevent use of drugs in rural areas of Thane district, foreign couriers are closed | ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीणमधील अंमली पदार्थांचा वापर रोखण्यासाठी परदेशी कुरिअर बंद, कंपन्यांवर लक्ष !

ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीणमधील अंमली पदार्थांचा वापर रोखण्यासाठी परदेशी कुरिअर बंद, कंपन्यांवर लक्ष !

googlenewsNext

ठाणे : जिल्ह्यातील ग्रामीण भागात अंमली पदार्थांचे सेवन व विक्री रोखण्याची गरज लक्षात घेऊन ग्रामीण पोलीस बंद पडलेल्या रासायनिक कंपन्यांची दरमहा विशेष गटामार्फत तपासणी करणारा आहे. तर वारंवार एकाच पत्त्यावरून  परदेशातून येणाऱ्या कुरियरवर लक्ष ठेवण्याचे निर्देश जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी आज येथे दिले.

जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक देशमाने यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृष्यप्रणालीद्वारे पार पडली. यावेळी समितीचे सदस्य तथा अतिरिक्त आयुक्त राहुल कुमार, राज्य उत्पादन शुल्कचे उपअधीक्षक चारुदत्त हांडे, अन्न औषध प्रशासनचे सहायक आयुक्त राजेश चौधरी, नार्टोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधीक्षक अमोल मोरे, टपाल विभागाच्या अधीक्षक अस्मिता सिंग, जिल्हा माहिती अधिकारी नंदकुमार वाघमारे, भिवंडीचे उपविभागीय अधिकारी अमित सानप आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात अमंली पदार्थांचा वापर रोखण्यासाठी सर्व विभागांनी सतर्क राहण्याच्या सूचना देशमाने यांनी यावेळी दिल्या. जिल्ह्यात अमंली पदार्थाविषयी जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ग्रामीण भागातील भिवंडी येथील गोदामांची पोलीसांच्या मदतीने तपासणी करण्याच्या व बंद असलेल्या एमआयडीसीमधील कंपन्यांची माहिती गोळा करण्याच्या सूचनाही देशमाने यांनी यावेळी दिल्या.

Web Title: To prevent use of drugs in rural areas of Thane district, foreign couriers are closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.