आज उच्च न्यायालयात टीडीआरचा अहवाल

By admin | Published: October 13, 2015 01:57 AM2015-10-13T01:57:35+5:302015-10-13T01:57:35+5:30

बदलापूर टीडीआर घोटाळा प्रकरणात अडकलेल्या मुख्याधिकाऱ्यांसह सहा अधिकाऱ्यांना न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ठाण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश होते.

Today the TDR report in the High Court | आज उच्च न्यायालयात टीडीआरचा अहवाल

आज उच्च न्यायालयात टीडीआरचा अहवाल

Next

ठाणे : बदलापूर टीडीआर घोटाळा प्रकरणात अडकलेल्या मुख्याधिकाऱ्यांसह सहा अधिकाऱ्यांना न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ठाण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश होते. या चौकशीचा अहवाल मंगळवारी १३ आॅक्टोबरला उच्च न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. त्यावर उच्च न्यायालय काय निर्णय देते, यावर या अधिकाऱ्यांचे भवितव्य अवलंबून आहे.
मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी, सहा. नगररचनाकर सुनील दुसाने, नगर अभियंते अशोक पेडणेकर, तुकाराम मांडेकर, किरण गवळे आणि निलेश देशमुख यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले. मात्र, या प्रकरणी अटक टाळता यावी, यासाठी या अधिकाऱ्यांनी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालय गाठले. न्यायलयाने या सर्व अधिकाऱ्यांचे अटकपूर्व जामिनावरील निर्णय राखून ठेवले. (प्रतिनिधी)
राजकीय भूमिकेचीही चौकशी: दुसरीकडे या प्रकरणातील राजकीय पुढाऱ्यांची भूमिका आणि त्यांचा सहभाग याचाही तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे. ज्या कंपन्यांच्या नावे ही कामे करण्यात आली आहेत, त्यांची सर्व माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. या कंपन्या कोणाच्या नावे आहेत आणि त्यांनी विकलेले डीआरसीचे पैसे कोणत्या खात्यात वर्ग झाले आहेत, याचीही माहिती काढण्यात येत आहे. राजकीय पुढाऱ्यांच्या परदेश दौऱ्यांचीही माहिती तपास अधिकाऱ्यांनी काढल्याचे पुढे येत आहे.

Web Title: Today the TDR report in the High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.