आज ठाण्यात पाणी नाही
By admin | Published: April 19, 2016 02:13 AM2016-04-19T02:13:52+5:302016-04-19T02:13:52+5:30
स्टेम प्राधिकरणाकडून ठाणे शहरास होणारा पाणीपुरवठा मंगळवारी सकाळी ९ ते गुरुवारी सकाळी ९ या कालावधीत बंद राहणार आहे.
ठाणे : स्टेम प्राधिकरणाकडून ठाणे शहरास होणारा पाणीपुरवठा मंगळवारी सकाळी ९ ते गुरुवारी सकाळी ९ या कालावधीत बंद राहणार आहे. तर, एमआयडीसीकडून होणारा पाणीपुरवठा बुधवारी सायंकाळी ६ ते शनिवारी सकाळी ६ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.
शहरातील समतानगर, श्रीनगर, इंदिरानगर, गांधीनगर, ऋतू पार्क, जेल, साकेत, उथळसर, जॉन्सन, इटर्निटी आदी परिसरांत पाणीपुरवठा मंगळवारी सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत सुरू राहणार आहे. रात्री ९ ते सकाळी ९ पर्यंत घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कम्पाउंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, ओवळा, रेतीबंदर, मुंब्रा कोळीवाडा, बॉम्बे कॉलनी, शैलेशनगर, संजयनगर व कळवा काही भाग या परिसराचा पाणीपुरवठा सुरू राहणार आहे. तर, बुधवारी सकाळी ९ ते गुरु वारी सकाळी ९ वाजेपर्यंत (२४ तास) ठाणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडील उपलब्ध पाणीसाठ्याच्या नियोजनाबाबत कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे विभाग यांनी ४० टक्के पाणीकपात करण्याचे कळवले असल्याने महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाकडून होणारा पाणीपुरवठा बुधवारी सायंकाळी ६ ते शनिवारी सकाळी ६ पर्यंत बंद राहणार असून या कालावधीत कळवा काही भाग, विटावा, मुंब्रा, दिवा, शीळ, कौसा, डायघर, देसाई, इंदिरानगर,
रूपादेवीपाडा, वागळे फायर ब्रिगेड, बाळकुमपाडा क्र .१ या परिसराचा (एमआयडीसीकडून होणारा) पाणीपुरवठा (६० तास) बंद राहणार आहे. (प्रतिनिधी)