टीएमटीवर आज कुणाचा झेंडा लागणार?, ९४ उमेदवार रिंगणात; सेना-भाजपाच्या लढाईवरच नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 03:39 AM2017-10-28T03:39:15+5:302017-10-28T03:41:49+5:30

ठाणे : १२ वर्षांनंतर लागलेल्या ठाणे परिवहन सेवेच्या टीएमटी एम्प्लॉइज युनियनच्या निवडणुकीत आता शेवटच्या टप्प्यात आरोप-प्रत्यारोप, श्रेयाची लढाई सुरू आहे.

Today, there will be a flag hoisting on TMT; 9 4 candidates in the fray; Look at the battle for the army-BJP | टीएमटीवर आज कुणाचा झेंडा लागणार?, ९४ उमेदवार रिंगणात; सेना-भाजपाच्या लढाईवरच नजर

टीएमटीवर आज कुणाचा झेंडा लागणार?, ९४ उमेदवार रिंगणात; सेना-भाजपाच्या लढाईवरच नजर

Next

ठाणे : १२ वर्षांनंतर लागलेल्या ठाणे परिवहन सेवेच्या टीएमटी एम्प्लॉइज युनियनच्या निवडणुकीत आता शेवटच्या टप्प्यात आरोप-प्रत्यारोप, श्रेयाची लढाई सुरू आहे. मागील २५ वर्षांत परिवहनला चांगले दिवस दिल्याचा दावा शिवसेनेकडून केला जात आहे. शिवसेनेने परिवहनचा बट्ट्याबोळ केल्याचा आरोप भाजपाने केला आहे. तिसरीकडे राष्ट्रवादीच्या पॅनलने मात्र आपला छुपा प्रचार कायम ठेवत या निवडणुकीत रंगत आणण्याचा प्रयत्न केला. परिवहनवर कोणाचा झेंडा फडकणार, हे आता शनिवारी रात्रीच निश्चित होणार आहे; परंतु या निवडणुकीत सात पदाधिकारी आणि सदस्यपदासाठी तब्बल ९४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले आहेत.
ठाणे परिवहनची सेवा १९८९ च्या सुमारास ठाणेकरांच्या सेवेसाठी सुरू झाली. त्यानंतर, स्वर्गीय आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली या परिवहन सेवेत टीएमटी एम्प्लॉइज युनियनची स्थापना करण्यात आली. ही एक मान्यताप्राप्त युनियन असून या युनियनवर १९९०-९१ च्या सुमारास धर्मवीर पॅनलने कब्जा केला होता. मधला काळ वगळता थेट १२ वर्षांनतर आता युनियनची निवडणूक लागली आहे. या निवडणुकीत सुरुवातीला शिवसेनेच्या धर्मवीर पॅनलविरुद्ध राष्टÑवादीचा शरद रावप्रणीत प्रगती पॅनल असा सामना रंगणार अशी चिन्हे होती. परंतु, अचानकपणे भाजपाच्या विकास पॅनलने या निवडणुकीत उडी घेतली आणि मतांचे विभाजन होण्यास सुरुवात झाली. विकास पॅनलने विकासाचा मुद्दा घेऊन शिवसेनेकडून झालेल्या चुकांचा पाढाच कामगारांपुढे वाचण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे, ज्या ६१३ कामगारांना कायम करण्याचे आश्वासन शिवसेना मागील कित्येक वर्षांपासून देत होती, त्याबाबतचा निर्णय भाजपाने एका फटक्यात शेवटच्या टप्प्यात आणून ठेवला आहे. दुसरीकडे शिवसेनेकडूनदेखील भाजपाचे आता केंद्राचे दाखले दिले जाऊ लागले असून त्यांच्याकडून केवळ दिशाभूलच केली जात असल्याचा आरोप होत आहे. या निवडणुकीत शिवसेनेकडून स्वत: ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, सभागृह नेते नरेश म्हस्के यांच्यासह अनेक दिग्गजांनी प्रचारात घौडदोड घेतली आहे. दुसरीकडे भाजपाच्या वतीने आमदार संजय केळकर, शिवाजी पाटील, नारायण पवार, भरत चव्हाण, कृष्णा पाटील यांनी शिवसेनेविरोधात रणशिंग फुंकले आहे.
>निवडणुकीचा प्रचार शुक्रवारी सायंकाळी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत संपला आहे. शनिवारी सकाळी ७ पासून मतदानाला सुरूवात होईल.एनकेटी महाविद्यालयात ५ पर्यंत मतदान पार पडेल. यात १८८९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.सायंकाळी६ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. पारंपरिक मतपत्रिका असल्याने रात्री १२ वाजेपर्यंत निकाल हाती येतील.

Web Title: Today, there will be a flag hoisting on TMT; 9 4 candidates in the fray; Look at the battle for the army-BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे