आदिवासीपाड्यांत आज आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन

By admin | Published: August 9, 2016 02:22 AM2016-08-09T02:22:11+5:302016-08-09T02:22:11+5:30

संयुक्त राष्ट्र संघाने (युनो) दरवर्षी ९ आॅगस्ट हा ‘जागतिक विश्व आदिवासी दिवस’ म्हणून जाहीर केला आहे.

Today in the tribal tribal day international tribal day | आदिवासीपाड्यांत आज आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन

आदिवासीपाड्यांत आज आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन

Next

ठाणे : संयुक्त राष्ट्र संघाने (युनो) दरवर्षी ९ आॅगस्ट हा ‘जागतिक विश्व आदिवासी दिवस’ म्हणून जाहीर केला आहे. या आंतरराष्ट्रीय दिनाचे औचित्य साधून ठाणे शहरासह येऊर जंगलातील आदिवासीपाड्यांमध्ये मोटारसायकल रॅलीसह विविध कार्यक्रम आदिवासी बांधवांकडून साजरे केले जाणार आहेत.
एकविसाव्या शतकात जग प्रवेश करत असतानासुद्धा आदिवासी जमातीची कुटुंबे आजही उपेक्षित असून गरिबी, अशिक्षित, बेरोजगारी, कुपोषण या समस्यांशी लढा देत आहेत. आदिवासी संस्कृतीवर होणारे आक्र मण व मुख्य प्रवाहाच्या नावाखाली त्यांच्या केल्या जाणाऱ्या सामिलीकरणामुळे आदिवासी संस्कृती धोक्यात आली असल्याचा आरोप आदिवासी संघटनांकडून केला जात आहे.
या समस्या दूर करण्यासह हक्कांची जाणीव करून देणे आणि ते प्राप्त करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने (युनो) ९ आॅगस्ट हा आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन म्हणून जाहीर केला आहे. हा आदिवासींचा गौरव दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. यानुसार, ठाणे परिसरात प्रथमच लोकमान्यनगर, येऊर, कोकणीपाडा, टकारडा, गायमुख तसेच ठाणे जिल्ह्यातील खेड्यापाड्यांमध्ये, डोंगरदऱ्यांतील वस्त्यांमध्ये या गौरव दिनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी जिल्ह्यातील विविध आदिवासी संघटना पुढे आल्या आहेत.
आदिवासींना या दिवसाचे महत्त्व समजावण्यासाठी ठाणे येथे संयुक्त आदिवासी उत्सव समितीचे हंसराज खेवरा, दत्ता भुयाळ यांच्या नेतृत्वाखाली मोटारसायकल रॅलीचे ठाण्यात आयोजन करण्यात येणार आहे. सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत ही रॅली खेवरा सर्कल येथून गांधीनगरमार्गे उपवन, कोकणीपाडा, वर्तकनगरमार्गे खोपट, सिव्हील हॉस्पिटल, राघोजी भांगरे चौक येथे येऊन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ या रॅलीचा समारोप होणार आहे. या वेळी समितीद्वारे आदिवासींच्या विविध समस्या व मागण्यांचे निवेदन ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले जाणार आहे.

Web Title: Today in the tribal tribal day international tribal day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.