कोकण पदवीधरचा आज फैसला, तीनही उमेदवारांचा विजयाचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 02:01 AM2018-06-28T02:01:07+5:302018-06-28T02:01:12+5:30

कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीचा उद्या (गुरुवारी) निकाल जाहीर होणार

Today's decision of Konkan graduate, claim of victory of all three candidates | कोकण पदवीधरचा आज फैसला, तीनही उमेदवारांचा विजयाचा दावा

कोकण पदवीधरचा आज फैसला, तीनही उमेदवारांचा विजयाचा दावा

googlenewsNext

ठाणे : कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीचा उद्या (गुरुवारी) निकाल जाहीर होणार असून विधान परिषदेवर या मतदारसंघातून कोण प्रतिनिधीत्व करणार, याचा फैसला होणार आहे. या मतदारसंघात ७३.८९ टक्के मतदान झाले असल्याने ही निवडणूक चुरशीची झाली आहे.  आरोप-प्रत्यारोप, सोशल मीडियावरील प्रचार यामुळे कोकण पदवीधरच्या निवडणुकीकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. मागील वेळेपेक्षा तब्बल २१ टक्के जास्त मतदान झाले असल्याने मतमोजणी होऊन निकाल जाहीर होण्यास अधिक वेळ लागणार हे तर उघड आहेच. मात्र हे वाढीव मतदान कोणता चमत्कार घडवणार, याची उत्सुकता आहे. वाढलेल्या मतांचा फायदा आम्हालाचा होणार, असा दावा तीनही प्रमुख पक्षातील उमेदवारांनी केला आहे.

निवडणुकीत डावखरे साहेबांच्या सहकाºयांनी भाजपाच्या वरिष्ठ मंडळींनी, विविध संघटनांनी प्रत्येक मतदाराबरोबर संपर्क साधला होता. शिवाय या मतदारसंघाचा मी यापूर्वी आमदार राहिलो असल्याने अनेकांनी चांगले सहकार्य केले. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढला आहे. मतदारसंघात केलेल्या कामाची पोचपावती मला मतदार देतील, अशी आशा आहे.
- निरंजन डावखरे, उमेदवार, भाजपा

पालघरप्रमाणे शिवसेनेने ही निवडणूक प्रथमच लढवली आहे. या मतदारसंघात शिवसेनेचे खासदार, आमदार, नगरसेवक आदींची संख्या अधिक आहे. पदवीधरांचे प्रश्न, सोडवण्यासाठी शिवसेनेकडून यापूर्वी प्रयत्न झालेले आहेत. आदित्य ठाकरे तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष केंद्रीत केल्याने मतदार कौल देतील अशी आशा आहे.
- संजय मोरे, उमेदवार, शिवसेना

सरकारच्या कामाबाबत कमालीची नाराजी आहे. त्यामुळे ही निवडणूक त्या सरकारांवर नाराजी व्यक्त करण्याचे माध्यम आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास तसेच राष्टÑवादीसह शेकाप आणि आघाडीच्या इतर पक्षाच्या पदाधिकाºयांनी सहकार्य केल्यानेच मतदानाचा टक्का वाढला आहे. सेना आणि भाजपावर नाराज असल्याचा फायदा आम्हालांच होईल.
- नजीब मुल्ला, उमेदवार, राष्टÑवादी

Web Title: Today's decision of Konkan graduate, claim of victory of all three candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.