मीरा-भार्इंदर महापालिकेच्या अंदाजपत्रकावरील आजची महासभा गाजणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2018 05:36 PM2018-03-27T17:36:33+5:302018-03-27T17:36:33+5:30

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या २०१८-१९ मधील अंदाजपत्रकाला भाजपा सत्ताधाऱ्यांकडून एकतर्फी मान्यता मिळू न देता त्यावर सविस्तर चर्चा करण्यासह आवश्यक सुचनांचा समावेश त्यात करण्यासाठी काँग्रेसचे जुबेर इनामदार व भाजपाच्याच गीता जैन यांनी ‘ज’ चा प्रस्ताव आजच्या अंदाजपत्रकीय महाभसेत मांडणार असल्याने हि महासभा चांगलीच गाजण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. 

 Today's General Assembly will be held on the budget of Mira-Bhairinder Municipal Corporation | मीरा-भार्इंदर महापालिकेच्या अंदाजपत्रकावरील आजची महासभा गाजणार

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या अंदाजपत्रकावरील आजची महासभा गाजणार

Next

- राजू काळे  

भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेच्या २०१८-१९ मधील अंदाजपत्रकाला भाजपा सत्ताधाऱ्यांकडून एकतर्फी मान्यता मिळू न देता त्यावर सविस्तर चर्चा करण्यासह आवश्यक सुचनांचा समावेश त्यात करण्यासाठी काँग्रेसचे जुबेर इनामदार व भाजपाच्याच गीता जैन यांनी ‘ज’ चा प्रस्ताव आजच्या अंदाजपत्रकीय महाभसेत मांडणार असल्याने हि महासभा चांगलीच गाजण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. 

पालिका आयुक्त बळीराम पवार यांनी ३ मार्चला २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे १ हजार २१३ कोटी ३२ लाख ७६ हजार रुपयांचे अंदाजपत्रक स्थायीच्या मान्यतेसाठी सभापती ध्रुवकिशोर पाटील यांच्याकडे सादर केले. सध्या कर वसुली रोडावल्याने पालिकेचा आर्थिक डोलारा ढासळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे यंदाच्या अंदाजपत्रकात गतवर्षीच्या अंदाजपत्रकाच्या तुलनेत ३४९ कोटी १४ लाख ९२ हजारच्या रक्कमेला कात्री लावून गेल्या अनेक वर्षांच्या वाढीव अंदाजपत्रकाच्या परंपरेला आयुक्तांनीन छेद दिला आहे. स्थायीने मात्र त्यात सुमारे १५७ कोटींची वाढ करुन हे अंदाजपत्रक १ हजार ३७० कोटींवर फुगविण्याची परंपरा कायम ठेवल्याने या वाढीव अंदाजपत्रकाला मान्यता देण्यासाठी आज विशेष महाभसेचे आयोजन करण्यात आले आहे. पालिकेत सध्या भाजपाची एकहाती सत्ता असल्याने महत्वाच्या ठरावांवर विरोधकांचे मत व सुचना विचारात घेतल्या जात नसल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात असतानाच या महासभेत पालिकेच्या मुळ अंदाजपत्रकासह अग्निशमन, परिवहन, वृक्षप्राधिक, शिक्षण, महिला व बाल कल्याण विभागांचे स्वतंत्र अंदाजपत्रकांना सुद्धा मान्यता दिली जाणार असुन त्यात सत्ताधारी आपल्या मनमानी कारभाराचा प्रत्यय आणून देण्याची खात्री झाल्याने काँग्रेसचे इनामदार यांच्यासह भाजपाच्याच जैन यांनी या अंदाजपत्रकांवर सविस्तर चर्चा करण्यासह त्यात सुचनांचा समावेश करण्यासाठी ‘ज’ चा प्रस्ताव मांडला जाणार आहे. याची माहिती मिळताच भाजपाचे नगरसेवक राकेश शहा यांनी देखील ‘ज’ चा प्रस्ताव सादर करुन विरोधकांच्या मनसुब्यावर पाणी फेरण्याचा प्रयत्न केला आहे. यात विरोधकांकडून एखादी सुचना, नवीन तरतूद किंवा करण्यात आलेल्या तरतूदीत वाढ प्रस्तावित केल्यास त्याचे श्रेय विरोधकांना मिळण्याची शक्यता हेरुन शहा यांनी ‘ज’चा प्रस्ताव दिल्याचे सांगण्यात येत आहे. याखेरीज काँग्रेस नगरसेवक अनिल सावंत यांनी सत्ताधाऱ्यांकडुन अंदाजपत्रकात केलेल्या मनमानी तरतुदींवर आक्षेप घेतला आहे. भाईंदर पूर्वेच्या नवघर येथील आरक्षण क्रमांक १०९ वर प्रस्तावित तरणतलावासाठी आर्थिक तरतूद न करता त्याची रक्कम दहिसर चेकनाका परिसरातील लोढा गृहसंकुल येथे प्रस्तावित तलावासह भार्इंदर पश्चिमेकडील तलावासाठी दर्शविण्यात आली आहे. यातील भार्इंदर पश्चिमेकडील प्रस्तावित तलावाची जागा मात्र स्पष्ट करण्यात आली नाही. तर लोढा येथील तरणतलावाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने  सत्ताधाऱ्यांनी वर्ग केलेल्या निधीतून कोणताही तलाव पुर्णत्वाला जाणार नसल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले. पश्चिमेकडीलच विनायक नगर समाजमंदिराच्या नुतनीकरणासाठी गतवर्षीच्या अंदाजपत्रकात सुमारे दिड कोटींची तरतूद करण्यात आली होती. त्यात पुन्हा सुमारे दिड कोटीची तरतूद करण्यात आली आहे. मुळातच हि जागा पालिकेच्या नावावर नसल्याने तत्कालिन आयुक्त अच्युत हांगे यांनी त्याच्या नुतनीकरणाला स्थगिती दिल्याने केलेली  तरतूद नेमकी कोणासाठी व कशासाठी, असा प्रश्न सावंत यांनी उपस्थित केला आहे. सत्ताधाऱ्यांनी करवाढच केली नसल्याचा प्रचार सुरु केला असला तरी मालमत्ता, घनकचरा व पाणीपट्टी दरवाढीस मान्यता दिल्याचे सावंत यांनी सांगितले. केंद्र व राज्य सरकारकडून पालिकेला कोट्यावधींचे अनुदान मिळाल्याची जाहिरातबाजी सत्ताधाय््राांकडून करण्यात आली असली तरी त्याची नोंद मात्र अंदाजपत्रकात करण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आगरी, कोळी, आदिवासी, वारकरी भवनासाठी केवळ १० लाखांची तरतूद करुन सत्ताधाऱ्यांनी या समाजाची दिशाभूल केल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे. 

Web Title:  Today's General Assembly will be held on the budget of Mira-Bhairinder Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.