आजपासून ठाण्यात कबड्डीचा थरार
By admin | Published: February 1, 2016 01:16 AM2016-02-01T01:16:46+5:302016-02-01T01:16:46+5:30
ठाणे कला-क्र ीडा महोत्सव-२०१६ अंतर्गत ठाणे महानगरपालिका व ठाणे जिल्हा कबडडी असोसिएशनच्यावतीने महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या
ठाणे : ठाणे कला-क्र ीडा महोत्सव-२०१६ अंतर्गत ठाणे महानगरपालिका व ठाणे जिल्हा कबडडी असोसिएशनच्यावतीने महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने सोमवारपासून ठाण्यात ३०संघात ‘कबड्डी कबड्डी’ चा थरार पाहता येणार आहे. परब वाडी, मेंटल हॉस्पीटल परिसर येथे तयार केलेल्या मैदानात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कबड्डीपटूंचा खेळ क्र ीडा रसिकांना अनुभवात येणार आहे. तर लाखो रुपयांची बक्षिसांची यावेळी लयलूट होणार आहे.
सोमवारी १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तर विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महापौर संजय मोरे यांच्या अध्यक्षतेखाली या स्पर्धेचा उद्घाटन होणार आहे. यावेळी खासदार राजन विचारे, डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, जितेंद्र आव्हाड, संजय केळकर, सुभाष भोईर, निरंजन डावखरे, उपमहापौर राजेंद्र साप्ते, सभागृह नेते अनिता गौरी, विरोधी पक्षनेते संजय भोईर, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल,आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेतील महिला व पुरु ष प्रथम क्र मांक विजेत्या संघास रोख रक्कम रु १ लाख, व्दितीय क्र मांक रक्कम रु . ७५ हजार, तृतिय क्र मांक रक्कम रु . ३० हजार चतुर्थ क्र मांक रक्कम रु . ३०हजार- तसेच उत्कृष्ट चढाई व पकड करणाऱ्या विजेत्यास प्रती दिन प्रत्येकी रु दोन हजार ५०० व स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट पुरु ष व महिला खेळाडूंना रक्कम रु २१ हजार अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. मालिकेतील उजवा कोपरी, डावा कोपरा, उजवा मध्यरक्षक, डावा मध्यरक्षक यांचेसाठी अनुक्र मे महिला व पुरु ष यांचेसाठी रु .५ हजारांची बक्षीसे दिली जाणार आहेत.