शरीरात अडकलेले ‘ते’ कापड होते सॅनिटरी पॅड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 12:42 AM2019-05-28T00:42:07+5:302019-05-28T00:42:09+5:30

ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात प्रसूतीदरम्यान एका महिलेच्या खाजगी जागेत अडकलेले कापड शस्त्रक्रिया करून अखेर बाहेर काढण्यात आले.

 The 'toe' cloth stuck in the body was sanitary pad | शरीरात अडकलेले ‘ते’ कापड होते सॅनिटरी पॅड

शरीरात अडकलेले ‘ते’ कापड होते सॅनिटरी पॅड

Next

ठाणे : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात प्रसूतीदरम्यान एका महिलेच्या खाजगी जागेत अडकलेले कापड शस्त्रक्रिया करून अखेर बाहेर काढण्यात आले. मात्र, ते कापड नसून सॅनिटरी पॅड असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे आता रु ग्णालय प्रशासन दोषी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करते याकडे रु ग्ण महिलेच्या नातेवाइकांचे लक्ष लागले आहे.
सावरकरनगर येथील महिलेच्या बाबतीत हा प्रकार घडला होता. प्रसूतीनंतर तिच्या गुप्तांगात कापड अडकले होते. त्यानंतर, तिला पुन्हा त्याच रुग्णालयात उपचारासाठी २२ मे रोजी दाखल केले होते. त्यानंतर, एक ते दीड तासाच्या आत पुन्हा शस्त्रक्रिया करून ते कापड बाहेर काढण्यात आले.
मनसेचे निवेदन
छत्रपती शिवाजी महाराज रु ग्णालयात घडलेल्या प्रकाराबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ठाणे शहराध्यक्षा रोहिणी निंबाळकर, शहर उपाध्यक्षा समिक्षा मार्कंडे आणि कोकिळा कासकर यांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराज रु ग्णालयाच्या डीन डॉ. संध्या खडसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
।ही घेणार काळजी
अशी घटना पुन्हा घडू नये, यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून पावले उचलण्यात आली आहेत. यापुढे प्रसूती कक्षाबाहेर सामाजिक कार्यकर्त्यांना बसवण्यात येणार आहे. तसेच डिस्चार्जच्यावेळी संबंधित महिला रुग्णास काही त्रास होतो का हे विचारतानाच त्रास होत नसल्याचे लिहून घेतले जाणार आहे.
।या प्रकरणात संशयित आढळून आलेल्या डॉक्टरांना तत्काळ रजेवर पाठवण्यात आले आहे. तसेच या प्रकरणाची येत्या दोन दिवसांत चौकशी पूर्ण होऊन त्यात दोषी आढळून येणाºया डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करण्यात
येणार आहे.
- डॉ. संध्या खडसे, डीन,
छत्रपती शिवाजी महाराज रु ग्णालय

Web Title:  The 'toe' cloth stuck in the body was sanitary pad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.