नगरसेवकांना आधार शौचालयांचा

By admin | Published: August 19, 2016 01:53 AM2016-08-19T01:53:35+5:302016-08-19T01:53:35+5:30

सहा महिन्यांवर आलेल्या निवडणुकींच्या तोंडावर आता सरत्या शेवटच्या वर्षात का होईना परंतु नगरसेवकांच्या प्रभागातील कामे आता काहीशी मार्गी लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

To the toilets of the corporators | नगरसेवकांना आधार शौचालयांचा

नगरसेवकांना आधार शौचालयांचा

Next

ठाणे : सहा महिन्यांवर आलेल्या निवडणुकींच्या तोंडावर आता सरत्या शेवटच्या वर्षात का होईना परंतु नगरसेवकांच्या प्रभागातील कामे आता काहीशी मार्गी लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. त्यानुसार मागील कित्येक वर्षे रखडलेली शौचालये दुरुस्ती आणि नवीन शौचालये बांधणीची कामे आता एकत्रिरित्या पटलावर घेतली आहेत. यात दुरुस्तीसाठी १५ कोटी ३७ लाख आणि नवीन शौचालयांच्या बांधकामांसाठी १२ कोटी ८९ लाखांची तरतूद केली आहे. दहा प्रभाग समितींमध्ये ही कामे केली जाणार असल्याने नगरसेवकांचे पाच वर्षांचे प्रगतीपुस्तक भरण्यासाठी या कामाचा महत्त्वाचा हातभार लागणार आहे.
गेली चार वर्षे महापालिकेची आर्थिक स्थिती नाजुक असल्याने आणि राजकीय समीकरणेदेखील काहीशी विस्कटली असल्याने अनेक नगरसेवकांच्या प्रभागातील कामे प्रलंबित राहिली आहेत. परंतु, वर्षभरापासून प्रभागातील कामे करण्यास निधी उपलब्ध झाला असून आता टप्प्याटप्प्याने विविध कामांची सुरवात झाली आहे. याच कामांवर मतांचा जोगवा मागायचा आहे.

Web Title: To the toilets of the corporators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.