टोलमुक्ती आणि मुबलक पाणी प्रतीक्षा; एकनाथ शिंदेंच्या मतदारसंघाचा आढावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2019 12:25 AM2019-09-09T00:25:48+5:302019-09-09T00:26:55+5:30

अनेक उद्योग असूनही स्थानिक बेरोजगारांना रोजगाराच्या संधी मिळालेल्या नाहीत

Toll-free and abundant water waiting; Overview of Eknath Shinde's constituency | टोलमुक्ती आणि मुबलक पाणी प्रतीक्षा; एकनाथ शिंदेंच्या मतदारसंघाचा आढावा

टोलमुक्ती आणि मुबलक पाणी प्रतीक्षा; एकनाथ शिंदेंच्या मतदारसंघाचा आढावा

Next

आमदार तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०१४ मध्ये निवडून येण्यापूर्वी टोलमुक्तीचे आश्वासन दिले होते. खारेगावनाक्यासह यात अंशत: यश आले असले, तरी अद्यापही टोलवसुली सुरूच आहे. पाण्याचे योग्य नियोजन नसल्यामुळे अनेक भागात आजही पाणीटंचाईची समस्या आहे. वाहनतळासाठीही योग्य नियोजन होणे अपेक्षित आहे. आठवड्यातील किमान एक दिवस हा स्थानिकांसाठी राखीव असावा, अशीही अपेक्षा आहे.

त्यांना काय वाटतं?
आमदार या नात्याने गेली अनेक वर्षे सातत्याने ज्या प्रकल्पांसाठी संघर्ष केला, ते सर्व महत्त्वाचे प्रकल्प पाच वर्षांत मार्गी लावले. ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान नव्या रेल्वेस्थानकाला मंजुरी मिळाली. कोपरी पुलाचे रुंदीकरण झाले. कोपरी ते पटणी खाडीवरील नवीन पुलाला तत्त्वत: मंजुरी, ठाणे शहरासाठी स्वतंत्र धरण झाले पाहिजे, यासाठी आग्रही भूमिका घेतली. त्यासाठी १० वर्षांपासून रखडलेल्या काळू प्रकल्पाला गती मिळाली. - एकनाथ शिंदे, आमदार

वचनांचं काय झालं?

  • टोलमुक्ती नारा देऊनही टोलवसुली सुरू
  • आरोग्यसेवांमध्ये सुधारणा नाही
  • पाणीवाटपाचे नियोजन नाही
  • वाहूतककोंडीपासून सुटका नाही
  • खड्डेमुक्त रस्तेही मिळाले नाहीत


सुविधांचा अभाव
मतदारसंघात एकेकाळची आशिया खंडातील सर्वात मोठी वागळे इंडस्ट्रिअल इस्टेट ही औद्योगिक वसाहत आहे. परंतु, या वसाहतीमध्ये अनेक समस्या आहे. पाणी, रस्ते आणि पथदिवे या मूलभूत सुविधांचाही इथे अभाव आहे. त्यामुळे चांगल्या कंपन्यांनाही माल निर्यात करताना मोठी कसरत करावी लागते. - योगेश माळी, किसननगर, ठाणे

TOP 5 वचनं

  • पाणीसमस्या सोडविणार
  • टोलमधून सुटका करणार
  • स्वच्छता आणि कचरा नियोजन
  • रोजगार संधी
  • क्लस्टर डेव्हलपमेंट राबविणार


हे घडलंय...

  • कोपरी पोलीस ठाण्याच्या नव्या इमारतीला मंजुरी
  • कोपरी ते पटणी खाडीवरील नवीन पुलाला तत्त्वत: मंजुरी
  • रेल्वेच्या कोपरी पुलाचे रुंदीकरण
  • ठाणे शहरांतर्गत मेट्रो प्रकल्पाला शासनाची तत्त्वत: मंजुरी
  • क्लस्टर डेव्हलपमेंटला मंजुरी, अंमलबजावणीला सुरुवात


हे बिघडलंय...

  • टोलमुक्तीचे आश्वासन देऊनही टोलवसुली सुरूच
  • नियोजनाअभावी शहरात नेहमीच वाहतूककोंडी
  • पाणीटंचाईचे निवारण नाही
  • अनेक भागांत रस्ते झाले पण खड्डेमुक्त रस्ते नाही

 

अनेक उद्योग असूनही स्थानिक बेरोजगारांना रोजगाराच्या संधी मिळालेल्या नाहीत. तरुणांना रोजगार मिळण्यासाठी योग्य नियोजन झाले पाहिजे. स्वच्छ आणि मुबलक पाणीही मिळावे, या अपेक्षा आहेत. - सुरेश शर्मा, ठाणे

कोपरी पोलीस ठाण्याच्या इमारतीला तसेच ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या जागेवर सुपरस्पेशालिटी रुग्णालयाला मंजुरी मिळाली आहे. परंतु, या दोन्ही कामांना अद्यापही वेग आलेला नाही. क्लस्टर डेव्हलपमेंटला मंजुरी मिळाली. पण, त्याची अंमलबजावणी कशा प्रकारे केली जाणार, याबाबत नागरिकांमध्ये अद्याप संभ्रम आहे. माफक दरामध्ये घरांची उपलब्धता व्हावी, अशी क्लस्टरमध्ये घरे जाणाऱ्या रहिवाशांची अपेक्षा आहे. ज्याप्रमाणे आरोग्य शिबिरे होतात, त्याच धर्तीवर चांगल्या दर्जाच्या आरोग्यसुविधा शासकीय रुग्णालयांमधून मिळणे अपेक्षित आहे.



पाच वर्षांत काय केलं?
गेल्या पाच वर्षांत क्लस्टर डेव्हलपमेंटसह ठाणे पूर्वेतील सॅटिस कोपरी पुलाच्या रुंदीकरणास मंजुरी. तसेच ठाणे-मुलुंडदरम्यान नवीन विस्तारित रेल्वेस्थानक, कळवा खाडीवर तिसरा पूल, जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या जागी सुपरस्पेशालिटी रुग्णालयाला मंजुरी. तहसील आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयांच्या एकत्रित पुनर्विकासाला तत्त्वत: मंजुरी मिळाली असून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर त्याठिकाणी सुसज्ज कार्यालय बांधण्यात येणार आहे.

का सुटले नाहीत प्रश्न?
मतदारसंघातील अनेक विकासकामे ही कागदावरच राहिली. गाजावाजा झालेल्या क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेला मंजुरी मिळाली. पण ती अद्यापही मार्गी लागलेली नाही. टोलमुक्तीचा नारा देत सत्ता गाठली. अगदी एमएसआरडीसीचे मंत्रीपदही मिळाले. पण प्रत्यक्षात ठाणेकरांची टोलमुक्तीमधून सुटका झालीच नाही. कोपरी, किसननगर, वागळे इस्टेट या भागात नेहमीच वाहतूककोंडी. वाहनतळाचेही नियोजन नसल्यामुळे वाहनचोरी आणि वाहतूककोंडीचा गंभीर प्रश्न आहे.

मतदारसंघाला काय हवं?

  • हवेय पाण्याचे योग्य नियोजन
  • उद्योजकांना हव्यात मूलभूत सुविधा
  • माफक दरात घरांची उपलब्धता हवी
  • तरुणांना हव्यात रोजगाराच्या संधी
  • खड्डेमुक्त रस्ते, दर्जेदार आरोग्यसुविधा

Web Title: Toll-free and abundant water waiting; Overview of Eknath Shinde's constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.