टोल आंदोलनातील कार्यकर्त्यांना लॉटरी? राज ठाकरेंनी मागवला आंदोलनाचा तपशील

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 12:10 AM2019-05-14T00:10:50+5:302019-05-14T00:15:30+5:30

टोलनाक्यावर मनसेने केलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांचे व्हिडीओ, फोटो पाठविण्याचे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात दिले.

Toll protest workers lottery? Raj Thackeray called for the agitation | टोल आंदोलनातील कार्यकर्त्यांना लॉटरी? राज ठाकरेंनी मागवला आंदोलनाचा तपशील

टोल आंदोलनातील कार्यकर्त्यांना लॉटरी? राज ठाकरेंनी मागवला आंदोलनाचा तपशील

Next

ठाणे : टोलनाक्यावर मनसेने केलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांचे व्हिडीओ, फोटो पाठविण्याचे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात दिले. त्यामुळे या आंदोलनात खळ्ळखट्याक करण्यात आघाडीवर असलेल्या कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीची लॉटरी लागण्याची चर्चा ठाण्यात सुरू झाली आहे. टोलसंदर्भातील पक्षाची भूमिका लवकरच स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.

राज यांनी ठाण्यातील एका हॉटेलमध्ये महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. सुरूवातीला त्यांनी तालुका अध्यक्षांकडून दुष्काळग्रस्त भागाची परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागण्याचे पदाधिकाºयांना आदेश दिले. सध्या आपल्याकरिता वातावरण चांगले आहे. वारंवार असे वातावरण निर्माण होत नाही. त्यामुळे सर्वसामान्य लोकांशी सौजन्याने वागण्याचा आदेश राज यांनी दिला. कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चला, जनतेची कामे करा, लोक तुमच्याकडे माझा प्रतिनिधी म्हणून पाहतात, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

पक्षाला गालबोट लावणा-या मनसैनिकांना पक्षातून काढण्यात येईल, अशी तंबीही त्यांनी घेतली. त्यांच्या या भूमिकेला पदाधिकाºयांनी टाळ््या वाजवून दुजोरा दिला. यावेळी आपला पक्ष शेतक-यांच्या पाठीशी असल्याची भूमिका त्यांनी मांडली.
दरम्यान, राज्यस्तरावरील पाच पदाधिका-यांच्या नियुक्त्या त्यांनी केल्या. त्यानुसार शेतकरी संघटनेच्या अध्यक्षपदी संतोष नागरगुजे, सहकार क्षेत्राच्या अध्यक्षपदी दिलीप धोत्रे, रोजगार - स्वयंरोजगार अध्यक्षपदी महेंद्र बैसाणे, जनहित विधी कक्ष अध्यक्षपदी किशोर शिंदे, तर रेल्वे कर्मचारी संघटना अध्यक्षपदी जितेंद्र पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.

टोलनाक्यांविरुद्ध पुन्हा एल्गार
या मेळाव्यात कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांना प्रश्न विचारण्याची संधी दिली गेली. त्यावेळी एका कार्यकर्त्याने मनसेची टोलबाबतची भूमिका काय, असा प्रश्न लोक आम्हाला विचारतात. टोलचे आंदोलन थांबले का? या प्रश्नाचेही उत्तर त्यांना द्यावे लागते, याकडे राज यांचे या कार्यकर्त्याने लक्ष वेधले.
राज म्हणाले की, आपल्या आंदोलनामुळे ६५ ते ७० टोलनाके बंद झाले. उर्वरित ८५ टोलनाक्यांपैकी काही बंद होऊ शकतात. टोलनाक्यांच्या विरोधात न्यायालयीन लढाई लढणारे संजय शिरोडकर हे मनसेत आले आहेत. त्यांच्याशी चर्चा करुन लवकरच टोलनाक्यांबाबत मनसेची भूमिका जाहीर केली जाईल.

तो ट्रेलर होता, आता पिक्चर दाखवणार : लोकसभा निवडणुकीत लाव रे तो व्हीडिओ या माध्यमातून आपण दाखवला तो ट्रेलर होता. विधानसभा निवडणुकीत आपण संपूर्ण पिक्चर दाखवणार असल्याचे राज यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सांगितले.

Web Title: Toll protest workers lottery? Raj Thackeray called for the agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.