ठाण्याच्या शौर्या अंबुरेची अव्वल कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 18:50 IST2025-04-18T18:49:49+5:302025-04-18T18:50:23+5:30
क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाकडून ३६ मुलांची निवड करण्यात आली होती .

ठाण्याच्या शौर्या अंबुरेची अव्वल कामगिरी
विशाल हळदे, ठाणे: एशियन युथ अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा २०२५ यावर्षी दम्माम , सौदी अरेबिया येथे १५ एप्रिल ते १८ एप्रिल दरम्यान संकुल येथे घेण्यात आल्या . स्पर्धेत ३० आशियाई देशांचा सहभाग होता . क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाकडून ३६ मुलांची निवड करण्यात आली होती .
महाराष्ट्राकडून ठाण्याची शौर्या अंबुरे (१०० मी अडथळा शर्यत) व नवी मुंबई ची आंचल पाटील (ऊंच उडी) यांची निवड करण्यात आली होती. शौर्या अंबुरे हिने सदर स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करत निवड फेरीत १३.८५ सेकंदात स्पर्धा संपवून personal best व निवड स्पर्धा सर्वात कमी वेळेत पूर्ण केली .
मुलींच्या अंतिम १०० मीटर अडथळा शर्यतीमध्ये,शौर्या हिने शर्थीने लढत देत कांस्य पदक पटकावले . अंतिम स्पर्धेत तिने १३.८ सेकंदात स्पर्धा संपवून personal best कामगिरी केली आहे.
आशियाई स्पर्धेत महाराष्ट्राला एकमेव मेडल मिळवून देणाऱ्या शौर्या हिचे क्रीडा जगतात विशेष कौतुक होत आहे . या विजयाने शौर्या सध्या १०० मी अडथळा स्पर्धेत जागतिक क्रमवारीत ४ थ्या क्रमांकावर आली आहे . शौर्या ही १५ वर्षांची असून दहावी बोर्ड परीक्षेचा अभ्यास करून तिने मिळवलेले यश वाखाणण्याजोगे आहे.शौर्या ही ठाण्याच्या universal high शाळेची विद्यार्थिनी असून ती ज्येष्ठ क्रिडा प्रशिक्षक अजित कुलकर्णी त्यांच्या Aim अकॅडमी मध्ये गेली ९ वर्ष प्रशिक्षण घेत आहे. अजित कुलकर्णी आतापर्यंत अनेक जागतिक स्तरावरचे खेळाडू घडवले आहेत .