ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस; ठाणे - उल्हासनगरला  चार जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 07:16 PM2019-08-03T19:16:13+5:302019-08-03T19:20:53+5:30

ठाणे येथे दोन व उल्हासनगर येथील एकाची पावसा दरम्यान मयत झाल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण कक्षाकडून कळले. यामध्ये ठाणे येथील मनोरूग्णालय परिसरातील वसाहतीमधील संतोष जाधव (१८) हा तरूण घरात पाणी शिरले असता फ्रीज हलवत असताना त्यास वीजेचा शॉक लागला. त्यात त्याचा मृत्यू झाला. तर दिवा येथील डीजे कंपाऊंड जवळील नाल्यात सुनित पुनीत (३०) हा तरूण नाल्यात पडून दगावला

Torrential rains in Thane district; Thane - Ulhasnagar kills four | ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस; ठाणे - उल्हासनगरला  चार जणांचा मृत्यू

सकाळच्या कालावधीत काही ठिकाणी उपनगरीय गाड्यांची सेवा काही काळ बंद करावी लागली.

Next
ठळक मुद्दे* भातसाचे पाच दरवाजे उघडलेभातसा नदी काठावरील गावाना सतर्कतेचा इशाराभातसा धरणाचे पाच दरवाजे २.५० मीटर इतके उघडण्यात आले

ठाणे :जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागाला मुसळधार पावसाने झोडपले. यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले. या कालावधीत ठाणे व दिवा येथील दोघांसह उल्हासनगर शहरातील दोघे आदी चार जणांचा मृत्यू झाला. यातील तिघे विजेच्या धक्याने व एकाचा नाल्यात पडून मृत्यू झाला आहे. तर भातसा धरण भरल्यामुळे त्यांचे पाच दरवाजे उघडले आहेत. या भातसा नदी काठावरील गावाना सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे.
         ठाणे येथे दोन व उल्हासनगर येथील एकाची पावसा दरम्यान मयत झाल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण कक्षाकडून कळले. यामध्ये ठाणे येथील मनोरूग्णालय परिसरातील वसाहतीमधील संतोष जाधव (१८) हा तरूण घरात पाणी शिरले असता फ्रीज हलवत असताना त्यास वीजेचा शॉक लागला. त्यात त्याचा मृत्यू झाला. तर दिवा येथील डीजे कंपाऊंड जवळील नाल्यात सुनित पुनीत (३०) हा तरूण नाल्यात पडून दगावला. तर उल्हासनगर येथील गौरी पाडा येथील मनीष चव्हाण या तरूणांचा विजेच्या धक्याने मृत्यू झाला आहे. आजच्या या पावसा दरम्यान झालेल्या. तर आमच्या वार्ताहर कळवतो की उल्हासनगर येथील कॅम्प नंबर एकमध्ये एका बालीकेचा वीजेच्या धक्कयाने मृत्यू झाल्याची घडली आहे.
जिल्ह्याभरातील या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुटी जाहीर करण्यात आली. मात्र निर्णय घेण्यास विलंब झाल्यामुळे काही शाळा सुरू झाल्या होत्या. या दरम्यान शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना घरी सुखरूप पोहोच करण्याची जबाबदार जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी शाळांवर सोपवण्यात होती. रेल्वे सेवा पार कोलमडली आहे. सकाळच्या कालावधीत काही ठिकाणी उपनगरीय गाड्यांची सेवा काही काळ बंद करावी लागली. ठाणे स्टेशन परिसरात रेल्वे रूळावर पाणी साचले होते. त्यानंतर दुपारी सुमारे दीड तास उशिराने उपनगरीय गाड्याची वाहतूक सुरू राहिली. सकाळच्या कालावधीत उल्हासनदीच्या पुराचे पाणी वाढल्यामुळे कल्याण-अहमदनगर महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. या महामार्गावरील माळशेज घाटातील अंबे वळणावर एक झाड पडले. ते त्वरीत हटवण्याचे कामही महामार्ग बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात आल्याचे उपकार्यकारी अभियंता सुनील पाटील, यांनी सांगिले.
कल्याण रेल्वे स्थानकातील छत गळतीमुळे प्लॅटफार्मवर पाणीच पाणी झाल्यामुळे प्रवाशांना उभे राहाण्यात अडथळा निर्माण झाला.याशिवाय कल्याण स्टेशन परिसरातही पाणी साचले. तर टाटा पॉवरहाऊस, वरपगांव, म्हारळ, कांबा, टिटवाळा परिसरातील रूंदी आदीं परिसरात पाणी साचले. नद्या पुराच्या पाण्यामुळे दूथडी वाहत होत्या. सततच्या पावसामुळे भातसा धरणाचे पाच दरवाजे २.५० मीटर इतके उघडण्यात आले. या धरणातून भातसा सुमारे ९३४ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. यामुळे भातसा नदीच्या काठावरील शहापूर -मुरबाड रस्त्यावरील सापगांव पूल, सापगांव व नदी काठावरील गावांना सतर्कतेच्या सुचना देण्यात आल्या आहेत. या काळात कोणत्याही प्रकारे वाहत्या पाण्यात प्रवेश न करण्याच्या व दक्षता घेण्याच्या सुचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील यांनी दिल्या आहेत. गेल्या २४ तासात जिल्ह्यात ८९० मिमी पाऊस पडला. या पावसाची सरासरी १२७.१४ मिमी.नोंद घेण्यात आली. सर्वाधिक पाऊस भिवंडी, शहापूर तालुक्यांमध्ये पडला आहे.

Web Title: Torrential rains in Thane district; Thane - Ulhasnagar kills four

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.